फसवणूक झाल्यास ग्राहक तक्रार निवारण कक्षाकडे दाद मागा

वकील सुमित जाधव यांचे आवाहन

मालवण दि प्रतिनिधी सध्याच्या जमान्यात बाजारपेठेतील वस्तूंच्या विक्री बरोबरच वस्तूंच्या ऑनलाइन विक्रीचा फंडा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. बहुतांश वेळा ऑनलाइन वस्तू खरेदीत ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता असते. सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या ऑनलाइन वस्तू विक्री बाबत ग्राहकांनी खबरदारी घेणे आवश्यक असून शॉप ऍक्ट अंतर्गत जी दुकाने किंवा संस्था किंवा कंपन्या यांच्याकडून वस्तूची खरेदी केल्यानंतर जर फसवणूक झाली तर ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत ग्राहकानी ग्राहक निवारण आयोगाकडे तक्रार दाखल केल्यानंतर सुयोग्य असा न्याय मिळू शकतो असे प्रतिपादन मालवणचे वकील ऍड. सुमित जाधव यांनी येथे बोलताना केले. मालवण तालुका विधी सेवा समिती आणि मालवण तालुका वकील संघटना यांच्यावतीने मालवणच्या भंडारी हायस्कूल मध्ये नागरिकांसाठी कोरोनाचे नियम पाळून ग्राहक संरक्षण कायदा या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळी ऍड. सुमित जाधव हे बोलत होते यावेळी व्यासपीठावर तहसीलदार अजय पाटणे, भंडारी ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य व्ही. जी. खोत, प्रा. रुपेश बांदेकर, प्रा. स्नेहल पराडकर, प्रा. गणेश सावंत, प्रा. सुनंदा वराडकर, प्रा. वैभवी वाक्कर आदी व इतर उपस्थित होते. प्रारंभी व्ही. जी. खोत यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी बोलताना श्री. सुमित जाधव यांनी ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती देतानाच ग्राहक म्हणजे कोण ? ग्राहकाचे अधिकार काय आहेत ? विधी सेवा समितीचे कार्य आदी विषयी सखोल माहिती दिली. यावेळी ग्राहकांनी वस्तूंच्या खरेदी विक्रीत सजगता पाळण्याचे आवाहन ऍड. जाधव यांनी केले. शेवटी प्रा. बांदेकर यांनी आभार मानले. *फोटो* मालवण येथे ग्राहक सरंक्षण कायद्याविषयी मार्गदर्शन करताना सुमित जाधव सोबत व्ही जी खोत व इतर

You cannot copy content of this page