आठ दिवसात रस्ता सुस्थितीत करा
मनसेची नगरपरिषदेला डेडलाईन;अन्यथा मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा दिला इशारा *⚡सावंतवाडी ता.१६-:* सावंतवाडी सबनीसवाडा येथील प्रांत कार्यालय ते जिमखाना महापुरुष मंदिर तेथून ते चार नंबर शाळेपर्यतचा रस्त्याची पूर्णतः चाळण झाली आहे. तर त्यातच जिओ केबलसाठी चर खोदण्यात आला असून हे चर योग्य रीतीने भरण्यात न आल्याने भराव खचून वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी अपघात झाल्यास…
