सिंधुदुर्ग पोलिसांची सागरी सुरक्षा अभेद्य

३६ तास राबविण्यात आली सागरी सुरक्षा मोहीम;घुसखोरी करू पाहणाऱ्या रेट टीमला ब्ल्यू टीमने रोखले मालवण दि प्रतिनिधी सागरी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी पोलिसांच्या व सागरी सुरक्षा यंत्रणा यांच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या सागर कवच मोहिमेत सिंधुदुर्ग पोलिसांची सागरी सुरक्षा अभेद्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेले ३६ तास पोलीस आणि सागरी सुरक्षा यांनी राबविलेल्या सागरी सुरक्षा मोहिमेत पोलिसांच्या…

Read More

मालवणातील वृत्तपत्र विक्रेते कुस्तान आल्मेडा यांचे निधन

*⚡मालवण ता.०२-:* मालवण शहरातील भरड येथील ज्येष्ठ रिक्षा व्यावसायिक तसेच वृत्तपत्र विक्रेते कुस्तान सालू आल्मेडा (वय-७०) यांचे काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कुस्तान हे मनमिळाऊ स्वभावाचे होते. मालवणातील पहिले रिक्षा चालक आणि मालक म्हणून त्यांचा नावलौकिक होता त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, जावई, बहीण, भाचे असा परिवार आहे.

Read More

अर्जुन पुरस्कार प्राप्त हिमानी परब हिचा अंकुश जाधव यांनी केला सत्कार

दोडामार्ग ता.०२-: भारत सरकार चा अर्जुन पुरस्कार प्राप्त मल्लखांब क्रीडापटू हिमानी परब यांचा कसाल वझरीवाडी येथील त्यांच्या निवास स्थानी भेट घेत समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी सत्कार केला. भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते हिमानी परब यांना अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यानंतर प्रथमच मल्लखांब क्रीडापटू परब सहकुटुंब आणि प्रशिक्षक उदय देशपांडे यांच्या सह कसाल येथे आल्या…

Read More

जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून उद्या दिव्यांग अधिकार व कायदे मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन…

*⚡ओरोस ता.०२-:* जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून ३ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत ओरोस फाटा येथील गोविंद सुपर मार्केट नजीक श्री इच्छापूर्ती गोविंद मंगल कार्यालय मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव न्या दीपक म्हालटकर हे उपस्थित राहून दिव्यांग अधिकार व कायदे याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. सिंधुदुर्ग…

Read More

भाजप पुरस्कृत सहकार पॅनेलच्या प्रचाराची सुरुवात

*⚡कणकवली ता.०२-:* खारेपाटण गट विविध सहकारी विकास सोसायटीची पंचवार्षिक निवडणुक जाहीर झाली आहे.या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष पुरस्कृत सत्ताधारी सहकार पॅनेलच्या प्रचाराची सुरुवात आज खारेपाटण येथील 72 खेड्यांचा अधिपती असलेल्या श्री कालभैरव मंदिरात नारळ ठेऊन करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाळा जठार, पंचायत समिती सदस्या तृप्ती माळवदे,भाजपा खारेपाटण शक्ती केंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर,मधुकर…

Read More

हुंबरट पावणाई देवीचा ४ डिसेंबरला जत्रोत्सव

कणकवली तालुक्यातील. हुंबरट गावचे जागृत ग्रामदैवत श्री.पावणाई देवी मूळ देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार दिनांक ४ डिसेंबर २०२१ रोजी होणार आहे. यानिमित्ताने धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. श्री.पावणाई देवी मूळ देवस्थान येथे या उत्सवाला आजूबाजूच्या पंचक्रोशीतील भाविक व माहेर वासिनी ओट्या भरणे , नवस बोलणे व नवस फेडणे , पंचारत फिरणे व नंतर…

Read More

विद्युत वाहिनी पडल्याने पाच बकऱ्यांचा मृत्यू

५० हजाराचे नुकसान:कासारवाडी परिसरातील घटना *⚡सावंतवाडी ता.०२-:* चरण्यासाठी गेलेल्या बकऱ्यावर विद्युत वाहिनीची तार कोसळून 5 बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. हा प्रकार आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कासारवाडी परिसरात घडला. यात जवळपास सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबतची माहिती ग्रामपंचायत सदस्य बाळू वेजरे यांनी दिली.

Read More

राष्ट्रीय छावा संघटनेच्यावतीने आयोजित किल्ला बनविणे स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संदीप नाईक, सावंतवाडी महिला तालुका उपाध्यक्ष निकिता परब, जिल्हा सदस्य महेंद्र चव्हाण, सावंतवाडी महिला शहराध्यक्ष संचिता गावडे, तुषार बांदेकर, पिंकी पारधी, केशव जाधव, अमर पाटील, सरिता भिसे, दीपक केदार आदी उपस्थित होते, स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांची नावे अनुक्रमे पुढीलप्रमाणे-प्रथम-निनाद सोनार, द्वितीय सर्वेश भराडी, तृतीय श्रेयस चव्हाण, चतुर्थ साईश बांदेकर, पाचवा…

Read More

हिमानी परब हिचा आमदार वैभव नाईक यांनी केला सत्कार

*⚡कुडाळ ता.०२-:* कुडाळ तालुक्यातील कसाल वज्रेवाडी येथील सिंधुकन्या मल्लखांब खेळाडू कु. हिमानी उत्तम परब हिला संपुर्ण भारतामधून सर्वोत्कृष्ट क्रीडापटूसाठी दिला जाणाऱ्या अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आज कसाल हायस्कूल येथे तिचा नागरी सत्कार करण्यात आला यावेळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी हिमानी परब हिला शाल श्रीफळ देऊन पुष्पहार घालून तिचा सत्कार केला. यावेळी…

Read More

वेंगुर्लेत रमण वायंगणकर,विकास वैद्य व जयप्रकाश चमणकर यांचा सत्कार

*⚡वेंगुर्ला ता.०२-:* भंडारी समाजामध्ये चांगली रत्ने घडून गेली आहेत.भंडारी समाजाने आपल्याला भरभरून प्रेम,पाठबळ दिले याला तोड नाही.आपण चार वेळा आमदार होण्याचे श्रेय भंडारी ज्ञाती बांधवांनाही जाते.रमण वायंगणकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले, त्याचा फायदा गोरगरीब, शिक्षणापासून वंचित असलेल्या,आर्थिक कोंडीत,दुर्बल घटक अशा लोकांना मदत करण्याचे काम जिल्हास्तरीय मंडळाने करावे,असे प्रतिपादन माजी आमदार…

Read More
You cannot copy content of this page