५० हजाराचे नुकसान:कासारवाडी परिसरातील घटना
*⚡सावंतवाडी ता.०२-:* चरण्यासाठी गेलेल्या बकऱ्यावर विद्युत वाहिनीची तार कोसळून 5 बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. हा प्रकार आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कासारवाडी परिसरात घडला. यात जवळपास सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबतची माहिती ग्रामपंचायत सदस्य बाळू वेजरे यांनी दिली.
