कणकवली तालुक्यातील. हुंबरट गावचे जागृत ग्रामदैवत श्री.पावणाई देवी मूळ देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार दिनांक ४ डिसेंबर २०२१ रोजी होणार आहे. यानिमित्ताने धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. श्री.पावणाई देवी मूळ देवस्थान येथे या उत्सवाला आजूबाजूच्या पंचक्रोशीतील भाविक व माहेर वासिनी ओट्या भरणे , नवस बोलणे व नवस फेडणे , पंचारत फिरणे व नंतर रात्रौ १२ वाजता गणेश भवानी नाट्यमंडळाच्या दशावतारी नाटकाचा कार्यक्रम होणार आहे.या उत्सवाच्या पूर्वी ३ दिवस देवडाळ्याचा म्हणजेच गावफेरीचा कार्यक्रम सुरु झाला आहे. त्याचबरोबर पहाटे ५ वाजता कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असलेला सुवर्णाचे ताट फिरवण्याचा कार्यक्रम होणार आहे,तरी सर्व भक्तांनी जत्रोत्सवास उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री . देवबाणकीलिंग व पावणादेवी न्यास मुंबई मंडळ हुंबरट, ग्रामविकास मंडळ आणि देवस्थान मानकरी व ग्रामस्थ यांनी केले आहे.हा जत्रोत्सव कोरोनाचे नियम पालन करून साजरा केला जाणार आहे.
हुंबरट पावणाई देवीचा ४ डिसेंबरला जत्रोत्सव
