*⚡कणकवली ता.०२-:* खारेपाटण गट विविध सहकारी विकास सोसायटीची पंचवार्षिक निवडणुक जाहीर झाली आहे.या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष पुरस्कृत सत्ताधारी सहकार पॅनेलच्या प्रचाराची सुरुवात आज खारेपाटण येथील 72 खेड्यांचा अधिपती असलेल्या श्री कालभैरव मंदिरात नारळ ठेऊन करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाळा जठार, पंचायत समिती सदस्या तृप्ती माळवदे,भाजपा खारेपाटण शक्ती केंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर,मधुकर गुरव,इस्माईल मुकादम,विजय देसाई,एकनाथ कोकाटे यांसह पॅनेलचे सर्व उमेदवार, पक्षाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
गेल्या पाच वर्षांत आमच्या संचालक मंडळाने सभासदाभिमुख कारभार केला असून संस्थेला नावलौकिक मिळवून दिला आहे.त्यामुळे या निवडणुकीत सभासद पुन्हा एकदा आमच्या पॅनेलवर विश्वास दाखवून आमचे पॅनल विजयी करतील असा विश्वास सूर्यकांत भालेकर यांनी यावेळी व्यक्त केला.
