*⚡ओरोस ता.०२-:* जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून ३ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत ओरोस फाटा येथील गोविंद सुपर मार्केट नजीक श्री इच्छापूर्ती गोविंद मंगल कार्यालय मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव न्या दीपक म्हालटकर हे उपस्थित राहून दिव्यांग अधिकार व कायदे याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा दिव्यांग कर्मचारी अधिकारी संघटनेच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शासकीय-निमशासकीय कर्मचारी-अधिकारी यांच्यासाठी हा कार्यक्रम होणार आहे, असे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ मिसरड, सचिव विष्णू धावडे यांनी सांगितले.
जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून उद्या दिव्यांग अधिकार व कायदे मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन…
