दोडामार्ग ता.०२-: भारत सरकार चा अर्जुन पुरस्कार प्राप्त मल्लखांब क्रीडापटू हिमानी परब यांचा कसाल वझरीवाडी येथील त्यांच्या निवास स्थानी भेट घेत समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी सत्कार केला.
भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते हिमानी परब यांना अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यानंतर प्रथमच मल्लखांब क्रीडापटू परब सहकुटुंब आणि प्रशिक्षक उदय देशपांडे यांच्या सह कसाल येथे आल्या होत्या. यावेळी समाजकल्याण सभापती जाधव यांनी परब यांचा पुष्पगुच्छ देत सत्कार केला. यावेळी प्रशिक्षक देशपांडे, ग्रामपंचायत सदस्य सौ. जगताप, प्रमुख मानकरी यशवंत परब यसह ग्रामस्थ उपस्थित होते. जाधव यांनी परब यांना शुभेच्छा दिल्या.
