अजित पवार २६ रोजी सिंधुदुर्गात

जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची माहिती *⚡सिंधुदुर्ग ता.१६-:* महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार २६ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिली. सामंत म्हणाले की, ज़िल्हा राष्ट्रवादीच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथे भेट घेऊन जिल्हा दौ-यावर येण्याची विनंती केली होती. त्यानुसार २६ डिसेंबर रोजी ते सिंधुदुर्ग जिल्ह्या…

Read More

लोबो यांनी नागरिकांमध्ये गैरसमज पसरवू नये

सुधीर अडिवरेकर यांचा पलटवार;घंटागाडी सुरु असल्याचा केला खुलासा *⚡सावंतवाडी ता.१६-:* शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो हे माहिती घेतल्या शिवाय नाहक टीका करून गैरसमज पसरवत असून, लोकांची दिशाभूल करत आहेत. फक्त प्रायोगिक तत्वावर कालच घंटागाडी बंद ठेवून चार मोठ्या गाड्या फिरवण्यात आल्या होत्या. परंतु, टायमिंग अभावी तो प्रयोग अयशस्वी ठरल्याने आज पासून पुन्हा नियमितपणे घंटागाड्या सुरू…

Read More

सावंतवाडी येथे 18 रोजी समाज साहित्य संमेलन कविसंमेलनासाठी कवींनी सहभागी होण्याचे आवाहन

*⚡कणकवली ता.१६-:* समाज साहित्य संघटना सिंधुदुर्गतर्फे शनिवार 18 डिसेंबर रोजी सायं. 5.30 वा. सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहात समाज साहित्य संमेलन 2021चे आयोजित करण्यात आले असून या संमेलनात आयोजित करण्यात आलेल्या खुल्या कविसंमेलनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नव्या-जुन्या कवींनी कविता वाचनासाठी सहभागी व्हावे तसेच सहभागी होणाऱ्या कवींनी खालील संपर्क नंबरवर आपली नाव नोंदणी करावी असे आवाहन संघटनेचे…

Read More

तांब्याचीवाडी येथील श्री सिद्ध सातेरी देवीचा 18 डिसेंबर रोजी वार्षिक उत्सव

*⚡कणकवली ता.१६-:* तांब्याचीवाडी येथील श्री सिद्ध सातेरी देवीचा वार्षिक उत्सव शनिवार 18 डिसेंबर रोजी साजरा होणार आहे.यानिमित्ताने भक्ति-भावाचा अपूर्व सोहळा अनुभवण्याची संधी भाविकांना प्राप्त होणार आहे. भुदरगड तालुक्यामध्ये येणारे आणि कोल्हापूर-सिंधुदुर्ग यांच्या अगदी सिमेवर ,सह्याद्रीच्या शेवटच्या टोकावर वसलेले एक निसर्ग संपन्न गाव..गावाच्या पूर्वेला सुंदर मौनी जलाशय, उत्तरेला घनदाट जंगल व तिथूनच वेदगंगा या प्रसिद्ध नदीचे…

Read More

महिला व बालकल्याण विभागाला हवी वाढीव १० टक्के तरतूद

कुणकेश्वर येथील मासिक सभेत घेतला ठराव;जिल्हा परिषद स्वउत्पन्नातून निधी देण्याची केली मागणी *⚡ओरोस ता.१६-:* महिला व बालविकास विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा रोजगाराच्या दृष्टीने महिलांना लाभ मिळावा, यासाठी वाढीव निधी मिळणे आवश्यक असून जिल्हा परिषद स्व उत्पन्नातील १० टक्के तरतुदीत वाढ करून वाढीव निधीची मागणी करणारा ठराव पार पडलेल्या महिला व बालविकास समिती सभेत करण्यात आला….

Read More

विविध समस्या सोडविण्यासाठी प्राथमिक शिक्षक संघ आक्रमक

२० रोजी तहसील तर २७ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार धरणे आंदोलन ओरोस ता १६ १ नोव्हें२०० ५ नंतर सेवेत आलेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. शिक्षण सेवक पद्धत बंद करून,नियमित शिक्षकाची नेमणूक करावी तसेच कार्यरत शिक्षणसेवकांचे मानधन वाढवावे. नव्या शैक्षणिक धोरणातील शिक्षण व शिक्षक विरोधी तरतुदी वगळण्यात याव्यात. या मागणीसाठी जुनी पेंशन…

Read More

कणकवलीत बस स्थानकासमोर मॅजिक स्टॅन्डचा शुभारंभ

*⚡कणकवली ता.१६-:* कणकवली बसस्थानकासमोर सहा आसनी मॅजिक स्टॅन्ड चा शुभारंभ कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. कणकवली – नाटळ, दिगवळे, बोर्डवे, आब्रड या भागात जाणाऱ्या प्रवाशांकरिता बसस्थानकासमोरील हे सहा आसनी मॅजिक स्टँड फायदेशीर ठरणार आहे. या भागात प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅजिक धारकांकडून स्टॅन्ड साठी…

Read More

सावंतवाडी, दोडामार्गातील नद्या होणार गाळमुक्त

पुंडलिक दळवी यांच्या प्रयत्नांना यश *⚡सावंतवाडी ता.१६- : कोकणातील नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठल्याने अनेक ठिकाणी गाळाची बेटे तयार झाली आहेत. त्यामुळे नद्यांची वहनक्षमता कमी झाली असून पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होते. त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी नदीपात्रातील गाळ, बेटे काढण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत देण्यात आले. यामध्ये सावंतवाडी तालुक्यातील बांदा, दोडामार्ग, माडखोल…

Read More

गरड येथील नाल्याच्या कामाची सुरुवात…

नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन… सावंतवाडी-:सावंतवाडी गरड परिसरातील स्वामी समर्थ मठ समोरील नाल्याच्या कामाचे आज नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते भूमिपूजन करून सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी नगरसेवक परिमल नाईक, शिवसेना नगरसेवीका भारती मोरे,नगरसेविका माधुरी वाडकर, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.

Read More

बांदा नीमजगा प्राथमिक शाळेच्या पालक व्यवस्थापन समितीवर संदीप बांदेकर यांची अध्यक्ष म्हणून निवड…

*⚡बांदा ता.१६-:* बांदा निमजगा येथील जि.प.पू. प्रा. शाळेत नवीन शाळा व्यवस्थापन पालक समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीवर सामाजिक कार्यकर्ते संदीप बांदेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून, शाळेच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता राऊळ आणि सर्व पालक यांनी त्याचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे. यावेळी समिती उपाध्यक्षपदी शिल्पा सावंत यांची निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित माजी…

Read More
You cannot copy content of this page