लोबो यांनी नागरिकांमध्ये गैरसमज पसरवू नये

सुधीर अडिवरेकर यांचा पलटवार;घंटागाडी सुरु असल्याचा केला खुलासा

*⚡सावंतवाडी ता.१६-:* शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो हे माहिती घेतल्या शिवाय नाहक टीका करून गैरसमज पसरवत असून, लोकांची दिशाभूल करत आहेत. फक्त प्रायोगिक तत्वावर कालच घंटागाडी बंद ठेवून चार मोठ्या गाड्या फिरवण्यात आल्या होत्या. परंतु, टायमिंग अभावी तो प्रयोग अयशस्वी ठरल्याने आज पासून पुन्हा नियमितपणे घंटागाड्या सुरू असल्याचे आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांनी स्पष्ट करत ज्येष्ठ नगरसेविका लोबो यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, राज्य सरकारने प्रतिवर्षी कचरा करावर दरवर्षी 5 टक्के कर वाढवण्याचे आदेश गॅजेट द्वारे दिले असताना देखील कोरोना मुळे सावंतवाडी नगरपालिकेने ते कर वाढवले नाहीत. परंतु, नगरपालिकेने कचऱ्यावरील कर वाढवले असल्याचा खोटा आरोप करत असल्याचे देखील त्यानी स्पष्ट केले. यावेळी नगरसेवक आनंद नेवगी उपस्थित होते.

You cannot copy content of this page