जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची माहिती
*⚡सिंधुदुर्ग ता.१६-:* महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार २६ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिली. सामंत म्हणाले की, ज़िल्हा राष्ट्रवादीच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथे भेट घेऊन जिल्हा दौ-यावर येण्याची विनंती केली होती. त्यानुसार २६ डिसेंबर रोजी ते सिंधुदुर्ग जिल्ह्या दौ-यावर येत आहेत. या दौऱ्यात ते सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोवीड १९,अतिवृष्टीमुळे व तोक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली, याभेटी दरम्यान माजी राज्यमंत्री प्रवीणभाई भोसले, जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत,माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डान्टस, प्रांतीक सदस्य सावळाराम अणावकर उपस्थित होते,
