पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षांचे संगोपन करा…

तहसीलदार अजय पाटणे यांचे आवाहन… मालवण दि प्रतिनिधी आज ग्लोबल वॉर्मिंगची समस्या जटिल बनत असल्याने वृक्ष संवर्धन ही काळाची गरज बनली आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षाचे संगोपन करणे ही महत्त्वाची बाब असून गेली काही वर्षे वडाचापाट येथील श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल हे वडाचापाट गाव आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना उत्पन्न देणाऱ्या वृक्षाचे वाटप करून एक स्तुत्य उपक्रम…

Read More

बोटिंग व्यवसायिकांचे प्रलंबित प्रस्ताव तातडीने निकाली न काढल्यास तीव्र आंदोलन…

पर्यटन व्यवसायिकांनी दिला इशारा… मालवण दि प्रतिनिधी-: तारकर्ली देवबाग खाडीत जलपर्यटन व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाईच्या नोटिसा बजावल्यानंतर संतप्त झालेल्या तारकर्ली देवबाग येथील पर्यटन व्यावसायिकांनी मालवणचे बंदर कार्यालय गाठत बंदर अधिकाऱ्यांनाच धारेवर धरले. आम्हाला विनापरवाना जल पर्यटन करण्याची हौस नाही. अधिकृत बोटींसाठी आवश्यक असणारी परवानगी देण्यास महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडून विलंब होत आहे आणि त्यामुळे आमच्यावर…

Read More

मालवण किनारपट्टी स्वच्छ राखण्याचा युवा फोरम संघटनेचा संकल्प

नगरपालिका व लोकसहभागातून राबविण्यात येणार मोहीम *⚡मालवण ता.१७-:* पर्यटन दृष्ट्या विकसित होणाऱ्या मालवण शहरात येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षात घेतानाच नागरिकांचे आरोग्य विचारात घेऊन मालवण किनारपट्टी स्वच्छ राखण्याचा संकल्प युवा फोरम या संघटनेने सोडला असून यापुढे नगरपालिकेबरोबरच लोकसहभागातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. युवा फोरमचे संस्थापक अध्यक्ष यशवर्धन राणे आणि त्यांच्या टीमने मालवण बंदर जेटी येथील…

Read More

आजगावकर वाडीतील दत्तमंदिर रस्त्यावर रेखाटण्यात आली रांगोळी

दत्तजयंतीनिमित्त ग्रामस्थांचा उपक्रम *⚡सावंतवाडी ता.१७-:* उद्या दत्तजयंती असल्याने त्यानिमित्त आज आजगावकर वाडीतील भागवत भटजी यांच्या निवासस्थानी असलेल्या दत्तमंदिरजवळ जाणाऱ्या रस्त्यावर आजगावकर वाडीतील ग्रामस्थांतर्फे सुंदर प्रकारे रांगोळी रेखाटण्यात आली आहे.

Read More

चारही नगर पंचायतसह जिल्हा बँक भाजपकडेच येणार

केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी व्यक्त केला विश्वास *⚡ओरोस ता.१७-:* जिल्ह्यात आचारसंहिता सुरू असलेल्या जिल्हा बँक व चारही नगरपंचायतमध्ये भारतीय जनता पक्षाचा एकतर्फी विजय होणार आहे. सामाजिक, विधायक, शैक्षणिक कार्य नसलेले शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र येऊन आमच्या विरोधात लढत आहेत. केवळ राजकीय टीका करून विनाकारण विरोध करण्याचा कार्यक्रम या तिन्ही पक्षाचा आहे. त्यामुळे सुज्ञ मतदार पुन्हा…

Read More

पत्रकारांचा विमा, निबंध स्पर्धा आणि स्वच्छता अभियान कणकवली तालुका पत्रकार संघाच्या सभेत विविध विषयांवर चर्चा

कणकवली 17 डिसेंबर (प्रतिनिधी)-कणकवली तालुका पत्रकार संघाच्या बैठकीत पत्रकारांचा विमा उतरवणे, निबंध स्पर्धा आयोजित करणे, वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याबाबत, अधिकार्‍यांसमवेत वार्तालापचा कार्यक्रम घेणे या विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच 23 डिसेंबरला सकाळी 8 वाजता तहसीलदार कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्याचे सर्वानुमेत ठरविण्यात आले. कणकवली तालुका पत्रकार संघाची बैठक तेलीआळी भवानी सभागृहात अध्यक्ष चंद्रशेखर देसाई यांच्या…

Read More

31 डिसेंबरच्या आत रस्ता दुरुस्त करण्याच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण सुटले…

*⚡सावंतवाडी ता.१७-:* कोलगाव, कुणकेरी आणि आंबेगाव रस्त्याचे बांधकाम. विभागाकडून सुरू असलेले काम गेले दोन वर्ष अर्धवट ठेवण्यात आले असून, या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे देखील पडले आहेत. याबाबत अनेक वेळा निवेदने देऊन देखील बांधकाम विभागाने योग्य कारवाई केली नसल्याने तेथील ग्रामस्थांनी आज बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. यावेळी एकतर रस्ता पूर्ण करा, अन्यथा…

Read More

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ पादुकांंचे २१ डिसेंबर रोजी कणकवलीत आगमन

*⚡कणकवली ता.१७-:* प्रतिवर्षाप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट यांच्या पादुका परिक्रमेचे कणकवलीत मंगळवार २१ डिसेबंर रोजी आगमन होणार आहे. २१ रोजी सकाळी ९ वा.कलमठ गोसावीवाडी येथील कै.आबा पाटील यांचा घरी आगमन त्यानंतर सकाळी १० ते ११ यावेळेत कलमठ नाडकर्णीनगर येथे विश्राम विश्वनाथ रासम यांचा घरी पादुकांचे आगमन होणार आहे. भाविकांनी श्री स्वामी समर्थ महाराज यांंच्या…

Read More

केवळ सत्ता द्या, शहराचा विकास करू…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निरीक्षक अर्चना घारे परब यांची ग्वाही… *⚡दोडामार्ग ता.१७सुमित दळवी-:* कसई दोडामार्ग नगरपंचायत मध्ये अपुरी राहिलेली कामे पूर्ण करून शहर प्रगतीपथावर नेण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाने कंबर कसली आहे. राष्ट्रवादी सेना पक्षाच्या हातात कसई दोडामार्ग शहराची सत्ता द्या, दोडामार्गचा विकास करू अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्ष निरीक्षक अर्चना घारे परब यांनी दोडामार्ग येथे पत्रकार…

Read More

मळगाव पंचायतन देवस्थानची तरंगकाठी देवीच्या पालखीसह ग्रामस्थांच्या भेटीला…

गावात चैतन्याचे व भक्तीचे वातावरण;तरंगकाठीचे व पालखीचे ग्रामस्थांकडून विधीवत पूजन *💫सावंतवाडी : सहदेव राऊळ-:* मळगाव पंचायतन देवस्थानची तरंगकाठी देवीच्या पालखीसह मळगाव ग्रामस्थांच्या भेटीसाठी गावात घरोघरी फिरविण्यात येत आहे. या कार्यक्रमामुळे गावात चैतन्याचे व भक्तीचे वातावरण असून घरी आलेल्या तरंगकाठीचे व पालखीचे प्रत्येक घरोघरी पारंपरिक रितीरिवाजाप्रमाणे विधीवत व भक्तिभावाने पूजन करण्यात येत आहे. मळगाव-सोनुर्ली देवस्थानचा सोनुर्ली…

Read More
You cannot copy content of this page