*⚡सावंतवाडी ता.१७-:* कोलगाव, कुणकेरी आणि आंबेगाव रस्त्याचे बांधकाम. विभागाकडून सुरू असलेले काम गेले दोन वर्ष अर्धवट ठेवण्यात आले असून, या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे देखील पडले आहेत. याबाबत अनेक वेळा निवेदने देऊन देखील बांधकाम विभागाने योग्य कारवाई केली नसल्याने तेथील ग्रामस्थांनी आज बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. यावेळी एकतर रस्ता पूर्ण करा, अन्यथा खडी काढून माती घाला अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच याबाबत तात्काळ दखल घेऊन योग्य कार्यवाही न केल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी 31 डिसेंबर पूर्वी हा रस्ता दुरुस्त करू असे लेखी आश्वासन दिल्याने अखेर हे उपोषण स्थगित करण्यात आले आहे.
यावेळी समाज कल्याण सभापती अंकुश जाधव, सरपंच विश्राम सावंत, ग्रा.सदस्य कृष्णकांत सावंत, ग्रा. सदस्य विनोद सावंत, सूर्यकांत सावंत, लक्ष्मण सावंत, मंगेश सावंत, राजन गावडे, योगेश चव्हाण, अमीर नाईक, कृष्णा मेस्त्री आदी उपस्थित होते. तसेच या उपोषणाला भाजप सावंतवाडी शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, गिरिधर बांदेकर, विनोद सावंत, आनंद नेवगी, भरत पुरोहित, अजय सावंत, सुरेश सावंत, उमेश परब, महादेव सावंत, शिवदत्त घोगळे, मायकल डिसोजा, संदेश माळकर, साहिल सावंत, मनोज धाटकर, नागेश सावंत, हनुमंत राणे, बाळकृष्ण सावंत, रमेश सावंत, डींगवे उपसरपंच प्रविण देसाई, निगुडे सरपंच प्रमोद गावडे, डेगवे माजी सरपंच मधुकर देसाई यांनी उपस्थित राहत पाठिंबा दिला.
