पालकमंत्री उदय सामंत यांचा उद्या कणकवलीत अभिष्टचिंतन सोहळा

कणकवली ता.२५-: महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.उदय सामंत यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा शिवसेना कणकवली विधानसभेच्यावतीने रविवार 26 डिसेंबर 2021 रोजी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, नरडवे नाका येथे सकाळी 8.30 वाजता साजरा करण्यात येणार आहे. यावेळी पालकमंत्री उदय सामंत आवर्जुन उपस्थित राहुन शिवसैनिकांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा स्विकारणार आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांच्या…

Read More

वायंगणी विकास संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेने उडवला भाजपचा धुव्वा

*⚡मालवण ता.२४-:* वायंगणी विकास संस्थेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष उदय दुखंडे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पॅनेलचे सर्वच्या सर्व १३ जागा जिंकत भाजपच्या पॅनेलचा धुव्वा उडविला. भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी वायंगणी विकास संस्थेची निवडणूक प्रतिष्ठेची बनविली होती. मात्र शिवसेनेच्या उदय दुखंडे यांच्या पॅनेलने भाजपच्या पॅनेलला धोबीपछाड देत सर्वच्या सर्व तेरा जागा जिंकत आपले निर्विवाद वर्चस्व राखले. या…

Read More

वेंगुर्ल्यात आठवणीतल्या खेळांना प्रारंभ

*⚡वेंगुर्ला ता.२४-:* ‘माझा वेंगुर्ला‘ येथील पाटकर हायस्कूलच्या भव्य मैदानावर आजपासून नव्या व जून्या पारंपारिक खेळांचा समावेश असलेला ‘खेळ आठवणीतले‘ खेळांना प्रारंभ झाला आहे. पहिल्याच दिवशी या खेळांना विविध स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी ‘माझा वेंगुर्ला‘च्या सर्व सदस्यांसह लहान मुले, पालक, ज्येष्ठ नागरीक आदींनी विविध खेळांचा आनंद लुटला. २६ डिसेंबरपर्यंत दुपारी ३ ते ६ या वेळेत…

Read More

भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते दादा पडवळ यांचे निधन

मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील चिंदर नागोचीवाडी येथील भाजपचे क्रियाशील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि ठेकेदार बापूजी उर्फ दादा दामोदर पडवळ(वय ४३) यांचे बुधवारी रात्री प्रदिर्घ आजाराने निधन झाले. चिंदर नागोची वाडी येथील रहिवासी दादा पडवळ हे चिंदर गावाबरोबरच आचरा पंचक्रोशीच्या विकासासाठी नेहमी कटिबद्ध असायचे. राजकारणाबरोबरच समाजकारणातही पडवळ यांचे योगदान मोलाचे होते. भाजपचे क्रियाशील कार्यकर्ते म्हणून म्हणून काम…

Read More

मडुऱ्यात उद्या सत्संग व पादुका दर्शन सोहळा

*⚡बांदा ता.२४-:* मडुरा येथील श्री मारुती मंदिरात शनिवार २५ डिसेंबर रोजी सत्संग व पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. म्हापसा – खोर्जुवे येथील श्री भगवती माता या कार्यक्रमात उपस्थित राहून भाविकांना मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी २ वाजता या सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. या कार्यक्रमाची परिसरातील भक्तगणांकडून जय्यत तयारी सुरु आहे. श्री भगवती मातांचे जल्लोषी स्वागत…

Read More

फसवणूक झालेला ग्राहक भारतात कुठेही तक्रार देऊन हक्क मिळवू शकतो…

तहसीलदार रामदास झळके यांचे प्रतिपादन… वैभववाडी प्रतिनिधी ग्रामीण भागात ग्राहक दिनाची जनजागृती होणे फार महत्त्वाचे आहे. ऑनलाइन शॉपिंग चे अधिकार कायद्याने ग्राहकांना दिलेले आहेत. फसवणूक झाल्यास ग्राहक भारतात कोठेही तक्रार देऊ शकतो. व आपले हक्क मिळवू शकतो असे प्रतिपादन तहसीलदार रामदास झळके यांनी व्यक्त केले. येथील तहसील कार्यालयात ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा वैभववाडी यांच्यावतीने राष्ट्रीय…

Read More

बांदा येथील द. भि. खानोलकर जनसेवा निधी संस्थेमार्फत दिले जाणारे पुरस्कार जाहीर

*⚡सावंतवाडी ता.२४-:* बांदा येथील सेवाभावी व्यक्तिमत्व स्वर्गीय डॉ. द. भि. खानोलकर यांच्या जनसेवा निधी बांदा या संस्थेमार्फत दिले जाणारे २०२१ चे पुरस्कार जाहीर झाले असून आदर्श प्राथमिक शिक्षक पुरस्कार माडखोल शाळा नं. २ चे शिक्षक अरविंद सरनोबत, माध्यमिक शिक्षक पुरस्कार कुडासे सरस्वती विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजचे क्रीडाशिक्षक सोमनाथ गोंधळी, नारायण यशवंत तथा नाना तारी आदर्श…

Read More

खासदार विनायक राऊत उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर

*⚡ओरोस ता.२४-:* रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव विनायक राऊत हे उद्या, २५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान सकाळी रेडी येथे ब्राम्हण देवालय कलशारोहण कार्यक्रमास उपस्थिती, ११.४५ वाजता कुडाळ येथे नगर पंचायत उमेदवाराशी चर्चा, दुपारी १.३० वाजता देवगड येथे सामाजिक कार्यकर्त्याच्या भेटी व विकासात्मक चर्चा करून ते रात्री ८…

Read More

मनसेच्या पाठपुराव्यामुळे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची बदली

परशुराम उपरकर यांचा दावा;अवैध धंद्यांना निर्बंध लावण्याची गरज *⚡कणकवली ता.२४-:* पर्यावरण प्रदूषण आणि अवैध उत्खनलाला गेली ३ वर्ष प्रोत्साहन देणारे अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांची काल जिल्ह्यातून बदली झाली. मनसेने अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांच्या बदलीसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे नवीन येणाऱ्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी आणि अन्य अधिकाऱ्यांनी या अवैध धंद्यांना निर्बंध लावण्याची गरज आहे,अशी…

Read More

असलदे डामरेवाडीच्या श्री साईमंदिरात दत्तजयंती उत्साहात

धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम;साईपादुकांची पालखी मिरवणूक *⚡कणकवली ता.२४-:* कणकवली तालुक्यातील असलदे डामरेवाडी येथील श्री.सोमवती देवी सेवा मंडळाच्यावतीने सालाबादप्रमाणे दत्तजयंती निमित्त साईपादुकांची पालखी मिरवणूक व ११ वा वर्धापन दिन सोहळा,सत्यनारायण महापूजा उत्सव १७ व १८ डिसेंबर २०२१ रोजी उत्साहात पार पडला. यावर्षी साई पालखी सोहळा कोरोनाचे नियम पाळून पार पडला व यंदा साईपालखी मिरवणूक असलदे ते श्री…

Read More
You cannot copy content of this page