मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील चिंदर नागोचीवाडी येथील भाजपचे क्रियाशील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि ठेकेदार बापूजी उर्फ दादा दामोदर पडवळ(वय ४३) यांचे बुधवारी रात्री प्रदिर्घ आजाराने निधन झाले. चिंदर नागोची वाडी येथील रहिवासी दादा पडवळ हे चिंदर गावाबरोबरच आचरा पंचक्रोशीच्या विकासासाठी नेहमी कटिबद्ध असायचे.
राजकारणाबरोबरच समाजकारणातही पडवळ यांचे योगदान मोलाचे होते. भाजपचे क्रियाशील कार्यकर्ते म्हणून म्हणून काम करणाऱ्या दादा पडवळ यांनी आचरा पंचक्रोशीत भाजप पक्ष वाढविण्यासाठी मेहनत घेतली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, भाऊ, बहिणी असा मोठा परिवार आहे. भारतीय जनता पार्टी चारकोप कांदिवलीचे तालुका सरचिटणीस योगेश पडवळ यांचे ते बंधू होत. त्यांच्या निधनामुळे चिंदरसह आचरा पंचक्रोशीत शोक व्यक्त होत आहे.
