*⚡वेंगुर्ला ता.२४-:* ‘माझा वेंगुर्ला‘ येथील पाटकर हायस्कूलच्या भव्य मैदानावर आजपासून नव्या व जून्या पारंपारिक खेळांचा समावेश असलेला ‘खेळ आठवणीतले‘ खेळांना प्रारंभ झाला आहे. पहिल्याच दिवशी या खेळांना विविध स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी ‘माझा वेंगुर्ला‘च्या सर्व सदस्यांसह लहान मुले, पालक, ज्येष्ठ नागरीक आदींनी विविध खेळांचा आनंद लुटला. २६ डिसेंबरपर्यंत दुपारी ३ ते ६ या वेळेत हे खेळ चालणार असून यामध्ये हुतूतू, लंगडी, साखळी, लगोरी, आट्यापाट्या, अची-पची, रिग-रुमाल, विटी-दांडू, काजुचे खेळ, ताईचा रुमाल, सायकल टायर, रस्सीखेच, दोरीउडी, उठबस, पास रनिग यासह अन्य खेळ खेळले जाणार आहेत.
