*⚡बांदा ता.२४-:* मडुरा येथील श्री मारुती मंदिरात शनिवार २५ डिसेंबर रोजी सत्संग व पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. म्हापसा – खोर्जुवे येथील श्री भगवती माता या कार्यक्रमात उपस्थित राहून भाविकांना मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी २ वाजता या सोहळ्याला प्रारंभ होणार आहे.
या कार्यक्रमाची परिसरातील भक्तगणांकडून जय्यत तयारी सुरु आहे. श्री भगवती मातांचे जल्लोषी स्वागत करण्यात येणार आहे. या सोहळ्याला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
