नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी फैसला

*⚡सिंधुदुर्ग ता.१३-:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी संतोष परब हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे आणि संदेश सावंत यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावरील मुंबई हायकोर्टातील सुनावणी पूर्ण झाली आहे. आता न्यायमू्ती चंद्रकांत भडंग हे या प्रकरणात सोमवारी निकाल देणार आहेत. दरम्यान, निकाल येईपर्यंत नितेश राणे आणि संदेश सावंत यांना अटकेपासून मिळालेला दिलासा कायम असणार आहे.

Read More

मारहाण प्रकरणी जामिनावर मुक्तता

*⚡सावंतवाडी ता.१३-:* जमिनीच्या वादातून तुकाराम धोंडू पाटील यांना मारहाण केल्याप्रकरणी इन्सुली – पागावाडी येथील शाहू उर्फ संदीप धोंडू पाटील याची सावंतवाडी न्यायालयाने पंधरा हजार रुपयांच्या सशर्त जामिनावर मुक्तता केली आहे. या प्रकरणी आरोपीच्यावतीने ऍड. परशुराम चव्हाण यांनी काम पाहिले.

Read More

त्यांना अकलेचे धडे मिळाले”,

सिंधुदुर्गात बोलताना नारायण राणेंचा खोचक टोला! अजित पवारांवर निशाणा? *⚡ओरोस ता.१३-:* सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या मुद्द्यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झालेला कलगीतुरा अद्याप संपायचं नाव घेत नाहीये. या निवडणुकीत भाजपाच्या पॅनलचा विजय झाला असून नारायण राणे यांनी त्यासंदर्भात पत्रकार परिषदेमध्ये सत्ताधारी महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांवर खोचक टीका केली होती. आता पुन्हा एकदा नारायण राणेंनी सत्ताधाऱ्यांवर…

Read More

खारेपाटण ज्युनिअर कॉलेजमधील ६५५ विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस

*⚡कणकवली ता.१३-:* खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नविनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण व ज्युनिअर कॉलेज खारेपाटण येथील इयत्ता ९ वी ते १२ वी या वर्गातील १५ ते १८ या वयोगटातील एकूण ६५५ विद्यार्थ्यांना नुकतीच महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग जि प सिंधुदुर्ग यांच्यावतीने विशेष कॅम्पचे आयोजन कोरोना प्रतिबंधक कोव्हक्सींन ही लस देण्यात आली. राज्यात व…

Read More

खारेपाटण पंचशील नगर येथे हायमास्ट दिव्याचे उदघाटन

*⚡कणकवली ता.१३-:* खारेपाटण ग्रामपंचायतीच्यावतीने १५ व्या वित्त आयोगातून मागासवर्गीय वस्ती करीता राखीव असलेल्या निधीतून येथील नागरिकांच्या मागणी नुसार व “आमचा गाव आमचा विकास ” आराखाड्या नुसार तरदूत करून सुमारे पावणे दोन लाख रुपये खर्च करून बसविण्यात आलेल्या हायमास्ट दिव्याचे उदघाटन खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांच्या हस्ते फित कापून व स्विच ऑन करून शुभारंभ करण्यात आला….

Read More

कणकवलीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतरासाठी हालचाली सुरू

18 गुंठे जागेतील आरओ डब्लू लाईन निश्चित *⚡कणकवली ता.१३-:* कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलातराबाबत प्रत्यक्षात कार्यवाहीला सुरवात झाली असून महामार्ग प्राधिकारणने 18 गुंठे जागेतील आरओडब्लू लाईन निश्चित केली आहे त्यामुळे येथील स्थानिक स्टॉलधारकाचे व्यवसाय उगड्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली असून यावेळी छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळ त्याचप्रमाणे नगरपंचायत प्रशासन, सकल मराठा समाज आणि स्थानिक…

Read More

रक्तदान शिबिरात ७१ दात्यांचे रक्तदान

*⚡वेंगुर्ला ता.१३-:* मठ-टाकयेवाडी येथील अष्टपैलू क्रिकेट खेळाडू गितेश गोपाळ गावडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अजित नाईक मित्र परिवार, संत लालाजी भक्त मंडळ आणि मठ गावातील सर्व क्रिकेट खेळाडू यांच्या संयुक्त विद्यमाने संत लालाजी मंदिर-टाकयेवाडी मठ येथे आयोजित रक्तदान शिबिरात ७१ रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान करुन कै.गितेश गावडेला श्रद्धांजली वाहिली. हे या शिबिराचे १२ वे वर्ष आहे. शिबिराचे…

Read More

सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेअंतर्गत तीन विद्यार्थी दत्तक

*⚡वेंगुर्ला ता.१३-:* जिल्हा परिषद शाळा खानोली-नाईकवाडी शाळेत सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेअंतर्गत तीन विद्यार्थी दत्तक घेण्यात आले. जाई सुनील नाईक-तळेकरवाडी, स्वप्नीला तोरसकर-कणकवली, राजेश घोलेकर, आवेरे या शिक्षण प्रेमींनी शाळेतील तीन मुलांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी प्रत्येकी ३००० रुपये प्रमाणे ९००० रुपये शाळेमध्ये जमा केले. खानोली-नाईकवाडी शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील नाईक यांनी सदरचे देणगीदार…

Read More

नवनिर्वाचित उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांना माजी नगरसेवकांकडून शुभेच्छा

*⚡सावंतवाडी.१३-: जिल्हा बँक अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड झाल्यानंतर आज सावंतवाडीचे माजी नगरसेवकांनी नवनिर्वाचित उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी माजी नगरसेवक परीमल नाईक माजी नगरसेवक उदय नाईक माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर आदी उपस्थित होते.

Read More

बांदा शहर भाजपच्यावतीने नवनिर्वाचित उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचा सत्कार

*⚡बांदा ता १३-: जिल्हा बँक अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड झाल्यानंतर आज बांदा शहर भाजपच्यावतीने नवनिर्वाचित उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पक्षाच्यावतीने पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, ज्ञानेश्वर सावंत आदी उपस्थित होते

Read More
You cannot copy content of this page