कणकवलीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतरासाठी हालचाली सुरू

18 गुंठे जागेतील आरओ डब्लू लाईन निश्चित

*⚡कणकवली ता.१३-:* कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलातराबाबत प्रत्यक्षात कार्यवाहीला सुरवात झाली असून महामार्ग प्राधिकारणने 18 गुंठे जागेतील आरओडब्लू लाईन निश्चित केली आहे त्यामुळे येथील स्थानिक स्टॉलधारकाचे व्यवसाय उगड्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली असून यावेळी छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळ त्याचप्रमाणे नगरपंचायत प्रशासन, सकल मराठा समाज आणि स्थानिक शिवप्रेमीं घटनास्थळी ठाण मांडून होते .आज केवळ आर ओ डब्ल्यू लाईन निश्चित करण्याचे काम सुरू आहे.

पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली ओरोस येथे झालेल्या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतराचा विषय गाजला होता यावेळी पालकमंत्र्यांनी सदर चा पुतळा प स समितीच्या शेजारील शासकीय 18 गुंठा जागेत बसवण्याचे निर्देश देतानाच 13 जानेवारी रोजी आर्किटेक पाठविण्याचे सांगितले होते त्यानुसार सकाळी आर्किटेक कामत हे कणकवलीत दाखल झाले त्यांच्यासोबत डेप्युटी इंजिनिअर महेश कट्टी, नायब तहसीलदार तानाजी रासम,मुख्याधिकारी अवधूत तावडे,उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, आर्किटेक अमित कामत,मंडळ अधिकारी मेघनाथ पाटील , महामार्ग प्राधिकरण महेश खाटीये,न.प.कर्मचारी किशोर धुमाळे,विभव करंदीकर, श्री.नेरकर तसेच छत्रपती शिवाजी चौक अध्यक्ष विद्याधर तायशेट्ये ,आनंद पारकर,भाई परब,महेश सावंत,कल्याण पारकर, शेखर राणे,सुश्नात दळवी,बच्चू प्रभुगावकर,सुशील सावंत, श्री.हिर्लेकर, राजेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.

पहिल्या टप्प्यात आर ओ डब्ल्यू लाईन निश्चित करण्यासाठी सुरुवात करण्यात आली त्यानुसार महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी लाईन निश्चिती केली उर्वरित जागा शासकीय जागेत मोडत असल्याचे सांगितले यानुसार सफेद रंगाच्या पावडरने हद्द निश्चित झाली. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी व स्थानिकांनी विविध प्रश्न उपस्थित केले त्यावेळी आज फक्त आरओडब्ल्यू लाईन निश्चित होणार असल्याचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी सांगितले. आर्किटेक कामत हे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणीसाठी प्लॅन तयार करतील त्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल असे सांगण्यात आले.यावेळी पंचायत समितीच्या बाजूला असलेल्या अठरा गुंठा जागेतील सर्व बांधकामाची पाहणी करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 500 स्क्वेअर फुट जागेत तात्पुरत्या स्वरूपात बसवण्याची मागणी छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ व सकल मराठा समाज यांच्यावतीने करण्यात आली होती परंतु पालकमंत्री उदय सामंत आणि आपण तात्पुरत्या स्वरूपातील पुतळ्याला परवानगी देऊ शकत नाही असे स्पष्ट करताना जर पुतळा त्याच ठिकाणी बसवायचा असेल तर संपूर्ण शासकीय जागा निश्चित करा अशा सूचना केल्या होत्या. शिवसेना युवा नेते संदेश पारकर यांनी सदर पुतळा महामार्गाच्या लगत असलेल्या बांधकाम विभागाच्या 23 गुंठे जागेत बसवण्याचा प्रस्ताव ठेवला होता परंतु शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ, सकल मराठा समाजाच्या मागणीनुसार हा पुतळा पंचायत समितीच्या बाजूलाच बसवायचा असेल तर अतिक्रमण हटवा अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या होत्या त्यानुसार आजआरओ डब्ल्यू लाईन निश्चित करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील पुतळा स्थलांतर होत असल्याने या जागेत व्यवसाय करणाऱ्या स्टॉलधारकांची कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे या पुतळा बाबत कोणते वळण मिळते याकडे लक्ष लागून राहिले आहे.

त्याचबरोबर महामार्ग प्राधिकरणने शहरातील जाणवली नदी ते गडनदी यादरम्यान च्या महामार्गाच्या दोन्ही बाजू कडील आर ओ डब्ल्यू ची लाईन निश्चित करावी अशी नवी मागणी जोर धरू लागली आहे.यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतरित होत असताना आता अतिक्रमणबाबत नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

You cannot copy content of this page