*⚡कणकवली ता.१३-:* खारेपाटण ग्रामपंचायतीच्यावतीने १५ व्या वित्त आयोगातून मागासवर्गीय वस्ती करीता राखीव असलेल्या निधीतून येथील नागरिकांच्या मागणी नुसार व “आमचा गाव आमचा विकास ” आराखाड्या नुसार तरदूत करून सुमारे पावणे दोन लाख रुपये खर्च करून बसविण्यात आलेल्या हायमास्ट दिव्याचे उदघाटन खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांच्या हस्ते फित कापून व स्विच ऑन करून शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमाला खारेपाटण उपसरपंच इस्माईल मुकादम,शिवसेना कणकवली उपतालुका प्रमुख महेश कोळसुलकर, खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते संकेत शेट्ये,खारेपाटण तंटामुक्त समिती अध्यक्ष मंगेश गुरव,खारेपाटण ग्रा प सदस्य योगेश पाटणकर सदस्या सौ.अंजली कुबल,आरती कर्ले,सोनल लोकरे, पंचशील विकास मंडळ खारेपाटण चे अध्यक्ष संतोष पाटणकर,संघमित्रा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. आकांशा पाटणकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
खारेपाटण पंचशील नगर येथे उभारण्यात आलेल्या या हायमास्ट दिव्याच्या लोणार्पण सोहळ्याच्या निमिताने येथील डॉ.वाबसाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्याला प्रथम मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे पंचशील विकास मंडळ खारेपाटणच्यावतीने स्वागत करण्यात आले.
पंचशील नगर ,खारेपाटण येथे बसविण्यात आलेल्या हायमास्ट दिव्यामुळे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक व “बुद्धविहार” परिसरात लक्ख प्रकाश पडला असून खारेपाटण पंचशील नगर येथील परिसर उजळून निघाला आहे.त्यामुळे येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.व खारेपाटण ग्रामपंचायतीचे आभार व्यक्त केले आहेत
