*⚡कणकवली ता.१३-:* खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नविनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण व ज्युनिअर कॉलेज खारेपाटण येथील इयत्ता ९ वी ते १२ वी या वर्गातील १५ ते १८ या वयोगटातील एकूण ६५५ विद्यार्थ्यांना नुकतीच महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग जि प सिंधुदुर्ग यांच्यावतीने विशेष कॅम्पचे आयोजन कोरोना प्रतिबंधक कोव्हक्सींन ही लस देण्यात आली.
राज्यात व देशात कोरोनाचा वाढता प्रदूर्भाव लक्षात घेता तसेच तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका विचारात घेता महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारने सर्व शाळांमधील वय वर्षे १५ ते १८ गटातील सर्वच विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला होता.या पार्श्वभूमीवर खारेपाटण हायस्कुल येथे देखील प्रा. आ.केंद्र खारेपाटण यांच्या वतीने नुकतीच सलग दोन दिवस विशेष लसीकरण कॅम्पचे आयोजन करून प्रशालेतील एकूण ६५५ विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली.
यावेळी खारेपाटण प्रा.आ.केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वडाम,सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ.पारकर तसेच खारेपाटण हायस्कुलचे मुख्यध्यापक श्री.प्रकाश अकिवाटे पर्यवेक्षक संजय सानप सर आदी उपस्थित होते. तसेच जे विद्यार्थी अत्यावश्यक कारणामुळे लस घेऊ शकले नाहीत अशा लसी पासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना करीता पुन्हा एकदा लसीकरण कॅम्प शाळेत घेण्यात येणार असल्याचे शाळेचे मुख्यध्यापक प्रकाश अकिवाटे यांनी सांगितले.
खारेपाटण प्रा. आ. केंद्राच्या सर्व कर्मचारी वर्गाने विद्यर्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी सहकार्य केले.
