त्यांना अकलेचे धडे मिळाले”,

सिंधुदुर्गात बोलताना नारायण राणेंचा खोचक टोला! अजित पवारांवर निशाणा?

*⚡ओरोस ता.१३-:* सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या मुद्द्यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झालेला कलगीतुरा अद्याप संपायचं नाव घेत नाहीये. या निवडणुकीत भाजपाच्या पॅनलचा विजय झाला असून नारायण राणे यांनी त्यासंदर्भात पत्रकार परिषदेमध्ये सत्ताधारी महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांवर खोचक टीका केली होती. आता पुन्हा एकदा नारायण राणेंनी सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

बँकेच्या अध्यक्षपदी मनीष दळवी आणि उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची निवड झाल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. “मोठमोठी लोकं अक्कल सांगायला इथे आलेली” नारायण राणेंनी यावेळी निवडून आलेले मनीष दळवी आणि अतुल काळसेकर यांचं अभिनंदन करतानाच विरोधकांवर निशाणा साधला. “११-७ ने आपण त्यांचा पराभव केला आहे. जिल्ह्यात मोठमोठी लोकं आली. फार काही बोलली. ही लोकं अक्कल सांगायला इथे आली होती. आज त्यांना अकलेचे धडे मिळाले असतील”, असं राणे म्हणाले आहेत. राणेंचा इशारा थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दिशेने असल्याचं बोललं जात आहे.

You cannot copy content of this page