⚡ओरोस ता १३-: दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्या गेलेल्या येथील जिल्हा रुग्णालयाचे कार्यालयीन अधीक्षक महादेव नारायण तेली (वय ५६ वर्षे, रा.स्वामी महादेव अपार्टमेंट,तेलीआळी कणकवली ) यांना जिल्हा विशेष न्यायाधीश सूर्यकांत इंदलकर यांनी २५ हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला आहे. तेली यांच्यावतीने ॲड संग्राम देसाई, ॲड सुहास साटम, ॲड जान्हवी दुधवडकर यांनी काम पाहिले.
४९ वर्षीय एका तक्रारदाराने त्यांच्या वैद्यकीय उपचारांच्या बिलाची फाईल मंजुरीसाठी सादर केली होती. मात्र, या बिलात त्रुटी असल्याचे सांगून कार्यालयीन अधीक्षक महादेव नारायण तेली यांनी काम पूर्ण करून देण्यासाठी बिलाच्या एकूण रकमेच्या ३ टक्के म्हणजेच १८ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती ही रक्कम १० हजार रुपये ठरवण्यात आली होती.
तक्रारदाराने या संदर्भात कुडाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केली होती. प्राप्त तक्रारीची शहानिशा केल्यानंतर ४ मे २०२६ रोजी सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रुग्णालयातील कार्यालयीन अधीक्षकांच्या कक्षातच एसीबीने सापळा रचला. ठरलेली १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना महादेव तेली यांना रंगेहात पकडण्यात आले होते. १२ मे रोजी तेली यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती.
लाच प्रकरणातील जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक महादेव तेली यांना सशर्त जामीन मंजूर…
