नेट-जेआरएफ परीक्षेत मराठी विषयात सौ. ज्योती बुवा तोरसकर यांचा देशात चौदावा क्रमांक

मालवण (प्रतिनिधी) मालवण येथील अ.शि.दे .टोपीवाला हायस्कूलच्या सहाय्यक शिक्षिका सौ.ज्योती रविकिरण बुवा-तोरसकर यांनी राष्ट्रीय पातळीवर सहाय्यक प्राध्यापक आणि ज्युनिअर रिसर्च फेलोशिप पदासाठी झालेल्या (नेट-जेआरफ)परीक्षेत मराठी या विषयात नेत्रदीपक यश मिळवले आहे. या परीक्षेत त्यांनी मराठी विषयात देशात चौदावा क्रमांक पटकाविला आहे. सौ. ज्योती तोरसकर यांनी यापूर्वी झालेल्या सेट परीक्षेत इतिहास आणि मराठी या विषयात यश…

Read More

बांदा येथील जि.प. निमजगा शाळेत शिवजयंती निमित्त विविध स्पर्धा संपन्न…

शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे घेतला सहभाग … बांदा ता.२२-:शहरातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा निमजगा येथे शिवजयंती निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत चित्रकला, रंगभरण, वक्तृत्व, वेषभूषा इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. सर्व विद्यार्थ्यांनी स्पर्धा मध्ये उस्फूर्त सहभाग घेऊन प्रावीण्य संपादन केले. सदर स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात आले. यावेळी स्पर्धेमधील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस व…

Read More

तालुक्याच्या पर्यटन विकासाची भरीव निधीची तरतूद करा…

युवासेनेची आदित्य ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.. दोडामार्ग ता.२२सुमित दळवी* दोडामार्ग तालुक्याच्या पर्यटन विकासासाठी व इतर कामांसाठी भरीव निधीची तरतुद करावी या मागणीसाठी युवा सेना दोडामार्गच्या वतीने पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन देण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग तालुका हा पर्यटनाच्या दृष्टीने अविकसित आहे.मात्र तालुक्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक स्थळे या तिराळी येथील मोठे धरण तेरवण मेढेचा…

Read More

चिपी विमानतळाला छत्रपती संभाजी राजे यांचे नाव द्या

रत्नाकांत कदम यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सिंधुदुर्गनगरी ता २२ सिंधुदुर्ग जिल्हयातील चिपी विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी राजे विमानतळ असे ठेवून नामांतर करण्यात यावे. अशी मागणी रत्नकांत कदम यांनी जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नव्याने सुरू झालेल्या चिपी विमानतळाचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नाव ठेवून नामांतर करण्यात यावे. अशी मागणी…

Read More

आंगणेवाडी यात्रेत बचतगट प्रदर्शन

जिल्हा बँक, नाबार्डचे आयोजन;अध्यक्ष मनीष दळवी उद्या करणार उदघाटन   सिंधुदुर्गनगरी ता २२ -: आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी जत्रोत्सवाचे औचित्य साधुन सिंधुदुर्ग जिल्हा बँक व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आंगणेवाडी येथील बचत गटांच्या उत्पादीत मालाच्या उत्पादीत मालाचे प्रदर्शन व विक्री कार्येक्रमाचा शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यश मनिष दळवी यांच्या हस्ते बुधवार २३फेब्रुवारी २०२२ रोजी…

Read More

कवयित्री सई लळीत यांच्या पुस्तकाचे उद्या प्रकाशन

सिंधुदुर्गनगरी, ता २२ कवयित्री व लेखिका डॉ. सई लळीत यांनी बालकुमारांसाठी लिहिलेल्या ‘तेरा त्रिक एकोणचाळीस’ या पुस्तकाचे प्रकाशन बुधवार, ता. २३ रोजी सकाळी ११ वाजता शिरगाव हायस्कुल (ता. देवगड) येथे होत आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्याहस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमाला लेखिका डॉ. सई लळीत, मुख्याध्यापक शमसुद्दीन अत्तार, नाट्यदिग्दर्शक डॉ. राजेंद्र चव्हाण उपस्थित राहणार…

Read More

बांदा नट वाचनालयाला ६० हजार रुपयांची देणगी

साहित्यिक, शैक्षणिक व वाचन चळवळीशी निगडित कार्यक्रम करण्याचे प्रकाश नेरुरकर यांचे आवाहन बांदा ता.२२-:* बांदा गावाला “पिंपळगाव” ही उपमा दिलेले प्रसिद्ध साहित्यिक (कै.) प्र. श्री. नेरुरकर यांचे कुटुंबीय व नातेवाईक यांनी येथील ऐतिहासिक नट वाचनालयाला ६० हजार रुपयांची देणगी दिली आहे. या रकमेतून साहित्यिक, शैक्षणिक व वाचन चळवळीशी निगडित कार्यक्रम करण्याचे आवाहन प्रकाश नेरुरकर यांनी…

Read More

गोट्या सावंत यांना सशर्त जामीन

ओरोस ता.२२-: शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. याबाबत सोमवारी सुनावणी पूर्ण झाली होती. बचाव पक्षाच्यावतीने वकील राजेंद्र रावराणे यांनी युक्तिवाद केला होता. तर सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी ऑनलाईन बाजू मांडली होती….

Read More

इन्सुली बिलेवाडीत शिवकालीन वेशभूषा स्पर्धेला प्रतिसाद

बांदा ता.२२-:* इन्सुली बिलेवाडी येथील जिल्हा परिषद शाळा नंबर 7 मध्ये शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवकालीन वेशभूषा व शिवचरित्रावर वक्तृत्व स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद लाभला. सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक अशोक सावंत यांच्यावतीने मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी यश संपादन करणाऱ्या व सहभाग घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांला पारितोषिक देण्यात आले. तर यापुढेही शैक्षणिक कार्यासाठी सर्वोत्तपरी…

Read More

वाफोली माऊली मंदिरात महारुद्र अभिषेक संपन्न

बांदा ता.२२-:* श्री देवी माऊली पंचायतन मंदिर वाफोली येथे सोमवारी व मंगळवारी महारुद्र अभिषेक ब्राम्हणांच्या मंत्रोच्चारांनी हजारों भाविकांच्या उपस्थित भक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा झाला. गेले दोन दिवस मंदिरात धार्मिक कार्यक्रमास गावातील सहकुटुंब ग्रामस्थांची उपस्थीती दिसून आली. मंगळवारी रात्री उशीरापर्यंत मंदिरात स्थानिकांची भजने, तीर्थप्रसादाचा भाविंकांनी लाभ घेतला. सोमवारी गणपती पुजन, पुण्याहवाचन, आच‍ार्यवरण, प्राकार स्थल शुद्धी, पंच‍मृत…

Read More
You cannot copy content of this page