⚡मालवण ता.११-:
मालवण तालुका तेली समाज उन्नती मंडळातर्फे प्रतिवर्षाप्रमाणे वार्षिक गुणगौरव सोहळा आणि वार्षिक सभा रविवार दि. २६ जुलै रोजी दुपारी २ वाजता लिलांजली हॉल, भरड मालवण या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे
तेली समाजातील इयत्ता दहावी मध्ये ७५ टक्के बारावी मध्ये ७० टक्के मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी तसेच पदवी व पदविका धारक, इंजीनियरिंग किंवा इतर प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी दि. १० जुलै ते १५ जुलै या काळात गुणपत्रक व आधारकार्ड यांची प्रत्येकी एक झेरॉक्स प्रत तेली समाज उन्नती मंडळाचे सचिव मंगेश शेर्लेकर यांच्याकडे पोस्टाने किंवा स्व:हस्ते देण्यात यावे तसेच १५ जुलै नंतर आलेली गुणपत्रके स्वीकारली जाणार नाहीत, याची नोंद विद्यार्थ्यांनी व पालकांनी घ्यावी. तसेच सर्व सदस्य व कार्यकारिणी सदस्यांनी कार्यक्रमास वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन तेली समाज उन्नती मंडळ, मालवणचे अध्यक्ष राजन आचरेकर व सचिव मंगेश शेर्लेकर यांनी केले आहे.
