निबंध स्पर्धेत चैताली पवार प्रथम

वेंगुर्ला ता.२६-:* नेहरु युवा केंद्र, सिंधुदुर्गतर्फे जागतिक मातृभाषा दिनानिमित्त घेतलेल्या निबंध लेखन स्पर्धेत चैताली पवार–प्रथम, सानिका वराडकर-द्वितीय, निकिता कबरे-तृतीय यांनी यश संपादन केले. या सर्वांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी नेहरू युवा केंद्र वेंगुर्ला प्रतिनिधी श्रीहर्षा टेंगशे, तुषार परब प्रा.वामन गावडे, प्रा.सचिन परुळकर उपस्थित होते.

Read More

जिव्हाळा सेवाश्रमास विठ्ठल पंचायतनतर्फे अन्नधान्य प्रदान

वेंगुर्ला ता.२६-:* सुरेश बिर्जे जिवन आधार चॅरीटेबल ट्रस्टच्या पिंगुळी येथील जिव्हाळा सेवाश्रम या अनाथश्रमास ६ वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या उत्कृष्ठ कामकाजाच्या निमित्ताने खानोली-सुरंगपाणी येथील श्री विठ्ठल पंचायतनाचे व्यवस्थापक दादा पंडीत महाराज व तळवडे येथील उद्योजक राजाराम गावडे यांनी सदिच्छा भेट देत अनाथाश्रमातील अनाथ व्यक्तींसाठी नेहमीच्या वापरातील अन्नधान्य ट्रस्टचे व्यवस्थापक सुरेश बिर्जे यांच्याकडे सुपुर्द केले. यावेळी…

Read More

राष्ट्रीय मतदार जनजागृती स्पर्धांचे आयोजन

वेंगुर्ला ता.२६-:* राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय मतदार जनजागृती स्पर्धेअंतर्गत पाच प्रकारच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी करुन सहभाग घ्यावा असे आवाहन सावंतवाडी उपविभागीय अधिकारी व वेंगुर्ला तहसिलदार यांनी केले आहे. भारत निवडणूक आयोगाद्वारे २५ जानेवारी ते १५ मार्च या कालावधीत ऑनलाईन मतदार जनजागृती स्पर्धा घेण्यात…

Read More

वेंगुर्ल्यात २७ रोजी शतायू सत्वपरिक्षा

*वेंगुर्ला ता.२६-: वेंगुर्ला येथील रामेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सवाचे औचित्य साधून रविवार दि.२७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता रामेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा ‘शतायू सत्वपरिक्षा‘ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. नाट्यरसिकांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Read More

सराव परीक्षांची नितांत गरज

कल्पना बोडके;प्राथमिक शिक्षक संघाच्या सराव परीक्षेला प्रतिसाद सावंतवाडी ता.२६-:* विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी सराव परीक्षांची नितांत आवश्यकता आहे. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ आणि गोडकर कुटुंबियांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन सावंतवाडीच्या गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांनी येथील आरपीडी महाविद्यालयात केले. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघातर्फे गुरुवर्य दशरथ गोडकर स्मृतिप्रित्यर्थ गोडकर कुटुंबीय पुरस्कृत तालुका स्तरीय शिष्यवृत्ती…

Read More

खेमराज महाविद्यालयाच्या स्पर्धांचे आयोजन

राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोसले यांनी केला शुभारंभ सावंतवाडी ता.२६-: येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयात पारंपारिक दिना निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नियामक मंडळाचे सदस्य जयप्रकाश सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल, प्रा. डॉ. बी….

Read More

विद्यार्थीदशेतील नेतृत्वगुण ठरतात दिशादायी

प्रा. रुपेश पाटील यांचे आयुर्वेद महाविद्यालयात प्रतिपादन सावंतवाडी ता.२६-:* मानवी जीवनाला खऱ्या अर्थाने सर्वोत्तम दिशा देण्याचे काम विद्यार्थी दशेतील नेतृत्व गुणाचे संस्कार करीत असतात. आपण कॉलेजमधून साकारलेली प्रत्येक उपक्रमशील गोष्ट पुढील आयुष्यात आपल्याला नेत्रदीपक यश प्रदान करते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा.रुपेश पाटील यांनी सावंतवाडी येथे केले. शहरातील भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाच्या वतीने आयोजित ‘स्टुडंट…

Read More

शाहूपुरी येथील १४ वर्षीय जलतरणपटू गुरूप्रसाद मोरे याचा अनोखा उपक्रम …

अरबी समुद्रातील सुमारे ८० सागरी मैलाचा जलप्रवास अवघ्या १९ तास २३ मिनिटात केला पूर्ण … मालवण दि प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या गड किल्ल्याबाबत कमालीची निष्ठा आणि आदर बाळगणाऱ्या कोल्हापूर शाहूपुरी येथील १४ वर्षीय जलतरणपटू गुरुप्रसाद विनोद मोरे याने छत्रपतीची सागरी राजधानी असणाऱ्या किल्ले सिंधुदुर्ग पासून किल्ले विजयदुर्ग पर्यंतचा अरबी समुद्रातील सुमारे ८० सागरी…

Read More

आंगणेवाडी जत्रेला आलेल्या मुंबईतील भाविकांच्या गाडीला कासारटाका येथे अपघात….

मालवण ता.२५ प्रफुल्ल देसाई-:* कुडाळहुन आंगणेवाडीला जाणाऱ्या मुंबईतील भाविकांच्या ओमनी गाडीला कुडाळ- मालवण रस्त्यावरील चौके कासारटाका बावखोल येथील अवघड उताराच्या रस्त्यावर कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव डंपरने धडक दिल्याने अपघात घडला. या अपघातात ओमनी गाडीचे मोठे नुकसान झाले असून गाडीतील चालक व काही भाविकांना दुखापत झाली. हा अपघात आज सकाळी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास घडला. आंगणेवाडी…

Read More

अवजड वाहतुकीसाठी करुळ घाट 3 आठवडे बंद

सिंधुदुर्गनगरी ता.२५-:* राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 जी वरील करुळ घाट रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग 166 जी वरील मौजे तळेरे ता. कणकवली पासून करुळ घाट, ता. वैभववाडी – गगनबावडा हद्दीपर्यंत रस्त्यावरील वाहतूक 3 आठवड्यांसाठी सर्व प्रकारच्या जड वाहनांसाठी बंद करणयाचे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. करुळ घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीचे…

Read More
You cannot copy content of this page