कल्पना बोडके;प्राथमिक शिक्षक संघाच्या सराव परीक्षेला प्रतिसाद
सावंतवाडी ता.२६-:* विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी सराव परीक्षांची नितांत आवश्यकता आहे. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ आणि गोडकर कुटुंबियांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन सावंतवाडीच्या गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांनी येथील आरपीडी महाविद्यालयात केले.
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघातर्फे गुरुवर्य दशरथ गोडकर स्मृतिप्रित्यर्थ गोडकर कुटुंबीय पुरस्कृत तालुका स्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी मुख्याध्यापक जगदीश धोंड, आदर्श पुरस्कार प्राप्त निवृत्त शिक्षक यशवंत गोडकर, प्रा. दिलीप गोडकर, म. ल. देसाई, स्नेहा लंगवे, प्रमोद पावसकर, प्रवीण मांजरेकर, अक्षता गोडकर, रामदास गोडकर, श्रुती पेडणेकर, संतोष वैज, अमर पाटील आदी उपस्थित होते. या परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पाचवीसाठी 649, तर आठवीसाठी 368 विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ झाले. पालक, शिक्षकांनी उपक्रमाचे कौतुक केले.
