शासनाच्या आर्थिक व कामगार विषयक धोरणाच्या विरोधात बँक कर्मचाऱ्यांचे आंदोलन…

सावंतवाडी ता.२८-: खाजगीकरण नको खाजगीकरण नको आम्हाला आमचा न्याय द्या सरकारी बँकांचे खाजगीकरण नको खाजगीकरण नको अशा घोषणा देत महाराष्ट्र स्टेट बँक एम्पलॉइज फेडरेशन सिंधुदुर्ग विभागाचे शेकडो कर्मचारी आज रस्त्यावर उतरले सावंतवाडी येथे केंद्र शासनाच्या आर्थिक व कामगार विषयक धोरणाच्या विरोधात स्टेट बँक ते महाराष्ट्र बँक पर्यंत मोर्चा काढत निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली….

Read More

डॉक्टर संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ.राजेंद्र पाताडे तर सचिवपदी डॉ.सुहास पावसकर

कणकवली ता.२८-:* डॉक्टर्स फ्रटरनिटी क्लब सिंधुदुर्ग ( ऍलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी व डेंटल ) या खाजगी डॉक्टरांच्या संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा हॉटेल नीलम कंट्रीसाईड, कणकवली येथे संपन्न झाली.सदर सभेस 150 पेक्षा जास्त संघटना सदस्यांनी उपस्थित दर्शवली.सन 2019 ते 22 या तीन वर्षाच्या कालखंडात, कोरोनाच्या वैश्विक साथजन्य संकट काळात, संघटना पातळीवरील सांघिक कामाच्या जोरावर आगामी सन 2022…

Read More

स्वामी राज प्रकाशन संस्थेतर्फे ” मराठी आठव दिवस” उपक्रम

कणकवली ता.२८-:* स्वामी राज प्रकाशन या संस्थेच्या वतीने ” मराठी आठव दिवस” हा उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमांतर्गत कोल्हापूर येथे पहिला कार्यक्रम संपन्न झाला. कोल्हापुरातील मराठी शाळेत शिकणाऱ्या रचना कोडलिकर, सारिका राठोड आणि झोया मुजावर या तीन अमराठी विद्यार्थिनींचा सत्कार संस्थेतर्फे करण्यात आला. कोल्हापुरातील नामवंत उद्योजक ‘ बालाजी कलेक्शन ‘ चे प्रमुख प्रशांत पोकळे…

Read More

“सिंधुरत्न समृद्ध”

सिंधुदुर्गातील_ *शेतकरी, मच्छिमार, पर्यटन व्यावसायिक, कसबी कारागीर, हस्तकला आधारीत, पारंपारीक व्यावसायिक, सुशिक्षित युवक-युवती महिला* अशा प्रत्येक उद्यमशील व्यक्तिंसाठी महाराष्ट्राचे 🚩 *मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे* व 🚩 *उपमुख्यमंत्री मा. अजित पवार* यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारकडून 🐟 *”सिंधुरत्न समृद्ध”* 🐟 योजना_ *सिंधुदुर्ग व रत्नागिरी* जिल्हयातील *जनतेच्या आर्थिक विकासाचा पथदर्शी* कार्यक्रम…! 🚩 🚣🏻‍♂️🐟🚣🏻‍♂️🐟🚣🏻‍♂️🐟🚣🏻‍♂️🐟🚣🏻‍♂️🐟🚣🏻‍♂️ 🟣 *ठळक वैशिष्ट्ये* 🟣 🟢सन…

Read More

गोवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची प्रमोद जठार व राजन तेली यांनी घेतली भेट

सिंधुदुर्ग दि.२८-:* गोव्याच्या मुख्यमंत्री पदाची दुसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर भाजप महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रमोद जठार आणि सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Read More

प्राथमिक शिक्षक संघटनेचे त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न

वेंगुर्ला ता.२८-:* न्यायाची चाड व अन्यायाची चीड, त्याग आणि सेवा या तत्वाला अनुसरून चालणारी, विविध शैक्षणिक तसेच सामाजिक उपक्रमात नेहमी अग्रेसर असणारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना शाखा वेंगुर्ला यांचे त्रैवार्षिक अधिवेशन उत्साहात संपन्न झाले. यावेळी गुणवंतांचा सन्मान करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात आली. येथील साई मंगल डिलक्स हॉल येथे आयोजित या अधिवेशनाचे उद्घाटन…

Read More

ऑनलाईन निबंध स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूलचे यश

वेंगुर्ला ता.२८-:* सेवांगण सायन्स क्लब,मालवण आयोजित शालेय गटासाठी झालेल्या ऑनलाईन निबंध स्पर्धेत उभादांडा न्यू इंग्लिश स्कूलच्या श्रुती श्रीधर शेवडे हिने जिल्ह्यात प्रथम तर श्रृतिका देवदत्त जुवलेकर हिने उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला. यांना प्रा.वैभव खानोलकर यांचे मार्गदर्शन लाभले. विज्ञान दिनाचे औचित्य साधून इयत्ता आठवी ते दहावी गटासाठी ‘भारतीय वैज्ञानिक आणि त्यांचे योगदान‘ यावर ही स्पर्धा घेण्यात आली…

Read More

युवा संदेशच्या माध्यमातून 1 लाख वह्या वाटप करणार:गोट्या सावंत

टॅलेंट सर्च परीक्षेसाठी ५२०० विद्यार्थी सहभागी कणकवली ता.२७-:* युवा संदेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वह्या वाटण्यात येणार आहेत पालघर येथील एका दानशूर मित्राने प्रतिष्ठानचे कार्य पाहून एक लाख वह्या दिल्या आहेत . त्याचे वाटप जूनपासून करण्यात येईल . एसटीएस परीक्षा एकाच दिवशी एकाच वेळी यशस्वी करण्यामागे सर्व शिक्षक संघटना यांचे मोठे सहकार्य राहिले आहे जिल्हा बँकेच्या…

Read More

हिर्लोक येथील खुल्या ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत तृप्ती इलेव्हन संघ विजयी…

युवा फोरम भारत संघटना, कै. सुधीर चव्हाण आणि नमो स्पोर्ट्स हिर्लोक यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आयोजन… सावंतवाडी ता.२७-:* युवा फोरम भारत संघटना, कै. सुधीर चव्हाण मित्रमंडळ आणि नमो स्पोर्ट्स हिर्लोक यांच्या संयुक्त विद्यमाने हिर्लोक येथे आज खुल्या ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन युवा फोरम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यशवर्धन राणे…

Read More

पर्यटन मंत्र्यांनी आपला शब्द पूर्ण करून पर्यटन व्यवसायिकाच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित करावी…

जिल्हा पर्यटन व्यवसायिक महासंघ अध्यक्ष विष्णू मोडकर यांनी व्यक्त केली अपेक्षा मालवण ता.२७-:* जिह्यातील प्रलंबित पर्यटन प्रकल्प व पर्यटन व्यावसायिकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे यांनी गेल्या महिन्यात आपल्या मालवण दौऱ्यात मार्च महिन्यात आपण ज्यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येऊ त्यावेळी पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या वर निश्चित बैठक घेऊन तोडगा काढू अशी ग्वाही पर्यटन…

Read More
You cannot copy content of this page