वेंगुर्ला ता.२८-:* सेवांगण सायन्स क्लब,मालवण आयोजित शालेय गटासाठी झालेल्या ऑनलाईन निबंध स्पर्धेत उभादांडा न्यू इंग्लिश स्कूलच्या श्रुती श्रीधर शेवडे हिने जिल्ह्यात प्रथम तर श्रृतिका देवदत्त जुवलेकर हिने उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला. यांना प्रा.वैभव खानोलकर यांचे मार्गदर्शन लाभले.
विज्ञान दिनाचे औचित्य साधून इयत्ता आठवी ते दहावी गटासाठी ‘भारतीय वैज्ञानिक आणि त्यांचे योगदान‘ यावर ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतील यशस्वी स्पर्धक व मार्गदर्शक शिक्षकांचे मुख्याध्यापक उमेश वाळवेकर यांच्यासह संस्था अध्यक्ष विरेंद्र कामत-आडारकर, सचिन रमेश नरसुले व संस्था पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहेत.
