पर्यटन मंत्र्यांनी आपला शब्द पूर्ण करून पर्यटन व्यवसायिकाच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित करावी…

जिल्हा पर्यटन व्यवसायिक महासंघ अध्यक्ष विष्णू मोडकर यांनी व्यक्त केली अपेक्षा

मालवण ता.२७-:* जिह्यातील प्रलंबित पर्यटन प्रकल्प व पर्यटन व्यावसायिकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे यांनी गेल्या महिन्यात आपल्या मालवण दौऱ्यात मार्च महिन्यात आपण ज्यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येऊ त्यावेळी पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या वर निश्चित बैठक घेऊन तोडगा काढू अशी ग्वाही पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्याच्या पार्श्वभूमीवर उद्या मालवण दौऱ्यावर येणाऱ्या ना.ठाकरे यांच्या दौऱ्याच्या कार्यक्रम पत्रिकेत याबाबत नोंद नसल्याने जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाने नाराजी व्यक्त करीत पर्यटन मंत्र्यांनी आपला शब्द पूर्ण करून जिल्हा पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित करावी जेणे करून इथल्या पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल अशी अपेक्षा जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघ अध्यक्ष श्री विष्णू मोंडकर यांनी व्यक्त केली आहे .

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री मोंडकर यांनी म्हटले आहे की नैसर्गिक संकट ,कोरोना व्हायरस मुळे गेली दोन ते तीन वषे जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाईक उध्वस्त झाला असून व्यावसायिक उभारीसाठी त्याची धडपड चालू आहे आज मूलभूत सुविधांसाठी व्यावसायिकांस धडपड करावी लागत आहे .

आंतराष्ट्रीय दर्जाचे स्कुबा डायव्हिंग सेंटर तारकर्ली येथे असूनही स्कुबा डायव्हिंग व्यवसायास अधिकृत परवानगी नाही या व्यवसायात पारंपरिक मच्छिमार काम करत असून प्रशिक्षित होण्यासाठी १५ हजार रुपये शासकीय फी असल्याने सामान्य कुटूंबातील व्यावसायिक पैसे भरणार कुठून अश्या व्यावसायिकांसाठी शासकीय पॉलिसी जाहीर होणे अपेक्षित आहे. आंग्रीया बेट ,सिवल्ड सारख्या प्रकल्पांना चालना देणे गरजेचे असून यामाध्यमातून जिल्ह्यात पर्यटन व्यवसाय वाढीस मदत होणार आहे .सिंधुदुर्ग जिल्ह्य पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर होऊन दोन दशके लोटूनही आजही जिल्ह्याची स्वतंत्र पर्यटन पॉलिसी नाही. गडकिल्ले , कातळशिल्पे ,कल्चर ,ऍग्रो,हिस्ट्री,मेडिकल ,साहसी क्रीडा,बीच टुरिझम क्षेत्र विषयी सक्षम पर्यटन धोरणाची गरज आहे .राज्यात पर्यटन वाढीसाठी अनेक अध्यादेश निघाले पण थेट उपयोग जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांसाठी झाला नाही आज कृषी पर्यटन धोरणासाठी लाभ घेण्यासाठी एक एकर क्षेत्राची गरज आहे यामध्ये बदल होणे गरजेचे आहे न्याहरी निवास नोंदणी प्रक्रिया त्रासदायक असून त्यामध्ये रजिस्टर होण्यासाठी ५००० रुपये नोंदणी फी पर्यटन महामंडळाकरून आकारली जात आहे व अनेक वर्षात एक ही रुपयाचा फायदा पर्यटन व्यावसायिकांस झाला नाही वास्तविक अनेक वेबसाईट मोफत रजिस्टर करून व्यवसायिकांस व्यवसायही देतात .न्याहारी निवास व्यवसायिकांस घरगुती गॅस ,निवासी दराने वीज तसेच अकृषिक जमीन करण्याची गरज नाही असे शासकीय अद्यादेश निघाले आहेत पण याची अंमबलबजावणी अजून होत नाही आहे .सी आर झेड ,वन संपदा या मध्ये पर्यटन विकास अडकला आहे .बीचशॅक पॉलिसी मध्ये आवश्यक बदल तसेच जिह्यातील समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या २५००० पेक्षा जास्त मच्छिमार कुटूंबाना पर्यटन व्यवसायाशी जोडण्याची प्रक्रिया तसेच व्यवसाय उभारणीसाठी शासकीय अनुदान नाही की कर्ज सुविधा उपलब्ध नाही अश्या अनेक समस्यांनी पर्यटन जिल्ह्यातील व्यावसायिक त्रस्त झाला असून यातून उभारणीसाठी मा.मंत्रीमहोदया कडून पर्यटन वाढीसाठी मोठ्या घोषणेची अपेक्षा जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांस आहे .महासंघाच्या वतीने पर्यटन मंत्री ना ठाकरे यांचे जिल्ह्यात स्वागत असून जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी चर्चासत्र आयोजित करून महासंघाला दिलेला शब्द पाळावा अशी अपेक्षा असल्याची माहिती महासंघ अध्यक्ष श्री विष्णू मोंडकर यांनी दिली आहे .

You cannot copy content of this page