हिर्लोक येथील खुल्या ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत तृप्ती इलेव्हन संघ विजयी…

युवा फोरम भारत संघटना, कै. सुधीर चव्हाण आणि नमो स्पोर्ट्स हिर्लोक यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आयोजन…

सावंतवाडी ता.२७-:* युवा फोरम भारत संघटना, कै. सुधीर चव्हाण मित्रमंडळ आणि नमो स्पोर्ट्स हिर्लोक यांच्या संयुक्त विद्यमाने हिर्लोक येथे आज खुल्या ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन युवा फोरम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यशवर्धन राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सचिव ऍड. हितेश कुडाळकर, सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख शुभम सिंदगीकर, रोहन करमळकर तसेच क्रीडाप्रेमी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

या स्पर्धेतील अंतिम सामन्यात तृप्ती इलेव्हन संघाने लिंगेश्वर इलेव्हन संघाचा पराभव करून विजेतेपद पटकाविले आहे. या स्पर्धेचे बक्षिस वितरण युवा फोरम संघटना, कै. सुधीर चव्हाण मित्रमंडळ आणि नमो स्पोर्ट्स हिर्लोक यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष यशवर्धन राणे, उपाध्यक्ष अमोल निकम, कुडाळ तालुका प्रमुख सौरभ शिरसाट, कुडाळ तालुका सचिव हर्षल देसाई, मुकेश कलुटकर तसेच क्रीडाप्रेमी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page