महाराष्ट्र हद्दीत काम सुरू असताना कर्नाटक वन विभागाची दंडेलशाही;.

कर्नाटक वन विभागाची दंडेलशाही खपवून घेणार नाही; बाबुराव धुरी दोडामार्ग ता.१२-:* सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या वतीने मांगेली तळेवाडी ते कर्नाटक सडा हद्दीपर्यंत रखडलेले काम सुरु झाले असताना मंगळवारी या ठिकाणी आलेल्या कर्नाटक कणकुबी वन विभागाचे वन कर्मचारी यांनी महाराष्ट्र हद्दीत काम सुरू असताना या ठिकाणी वन विभागाचा काडीमाञ संबध नसताना मुजोर वन कर्मचारी यांनी येथे…

Read More

श्री भगवती फिल्म्स प्रेझेन्टस श्वास हा भिडला या मराठी गाणी अल्म्बचा शानदार शुभारंभ…

नगराध्यक्षा साक्षी प्रभू आणि उपनगराध्यक्ष मिताली सावंत यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ देवगड ता.१२-: श्री भगवती फिल्म्स प्रेझेन्ट्स श्वास हा भिडला या मराठी गाणी अल्बम चा शुभारंभ देवगड बीच च्या निसर्गरम्य वातावरणात नगराध्यक्षा साक्षी प्रभू ,उपनगराध्यक्ष मिताली सावंत यांच्या शुभहस्ते गणेशपूजन पोस्टर फित कापून करण्यात आले. यावेळी धनशी कामतेकर यांनी देवगड तालुका पर्यटकांना आकर्षित करणारा…

Read More

सामाजिक समता सप्ताहानिमित्त पथनाट्याचे सादरीकरण

मालवण ता.१२-:* समाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताहानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक समता सप्ताहानिमित्त मालवण तालुक्यातील विविध भागांमध्ये पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. या पथनाट्यामध्ये बार्टीच्या समतादूतांनी सहभाग घेतला होता. मालवण शहर, मालवण फोवकांडा पिंपळ, वायरी भूतनाथ, समाजकल्याण वसतीगृह येथे पथनाटय़ाचे सादरीकरण करण्यात आले….

Read More

सावंतवाडी मतदारसंघातील रस्ते डांबरीकरण्यासाठी 5 कोटी रुपयाचा निधी मंजूर…

तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांची माहिती सावंतवाडी ता.१२-:* सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी गाववार रस्ते विकास खडीकरण डांबरीकरण यासाठी आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून सुमारे 99 विविध विकास कामांना पंचवीस पंधरा या अंतर्गत मंजुरी मिळाली असून पाच कोटी रुपयांचा निधी यासाठी खर्च करण्यात येणार आहे सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील दोडामार्ग वेंगुर्ला आणि सावंतवाडी तालुक्यातील विविध रस्ते या निधीतून…

Read More

सौ. चित्रा हरमलकर ठरल्या पैठणीच्या मानकरी

मालवण ता.१२-:* रामनवमी उत्सवानिमित्त मालवण गवंडीवाडा येथील श्रीराम मंदिर यांच्या वतीने आयोजित आणि आनंद वराडकर पुरस्कृत खेळ पैठणीचा या स्पर्धेत सौ. चित्रा चेतन हरमलकर या विजयी होऊन होत मानाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या. तर सौ. अक्षता रोहन आचरेकर यांनी द्वितीय व सौ. रुपाली वराडकर यांनी तृतीय क्रमांक मिळविला. या स्पर्धेचे उदघाटन रवी तळाशीलकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने…

Read More

सलग १८ तास वाचन स्पर्धेत विनिता पांजरी प्रथम

मालवण ता.१२-:* सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी), समतादूत प्रकल्प सिंधुदुर्ग आणि बॅ नाथ पै सेवांगण संचालित साने गुरुजी वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक समता सप्ताहानिमित्त साने गुरुजी वाचन मंदिर मालवण येथे सलग १८ तास वाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात विनिता पांजरी…

Read More

पोस्टल ग्रामीण डाक सेवकांचे प्रश्न सोडवण्याची मागणी

सिंधुदुर्ग विभाग मार्फत केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना दिले निवेदन ओरोस ता.१२-:* ऑल इंडिया पोस्टल ग्रामीण डाक सेवक संघटनेच्या सिंधुदुर्ग विभाग मार्फत केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची कसाल येथील मेडिकल कॉलेज मध्ये सदिच्छा भेट घेतली आहे. यावेळी पोस्टल ग्रामीण डाक सेवकांचे प्रश्न आणि समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्यासाठीचे निवेदन देण्यात आले आहे.

Read More

विलवडे नं.१ प्रशालेत “शाळा पूर्व तयारी” सोहळा उत्साहात

बांदा ता.१२-: जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक शाळा विलवडे नं.१ प्रशालेत “शाळा पूर्व तयारी” सोहळा उत्साहात संपन्न झाला. यामध्ये पुढील शैक्षणिक वर्षातील नवीन पहिलीत येणाऱ्या मुलांचे स्वागत, मुलांची बौद्धिक, शारीरिक आणि इतर क्षमता तपासणी करण्यात आली. तसेच कोरोना काळात झालेल मुलांचं शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी विचार विनिमय तसेच मुलाकडून घरी अभ्यास कसा करुन घ्यावा याविषयी पाल्यांना…

Read More

बांदेश्वर मंदिराच्या कलश रोहणाचा 27 रोजी “सहावा वर्धापन दिन” सोहळा

बांदा ता.१२-:* येथील आराध्य व जागृत असलेल्या श्री देव बांदेश्वर मंदिराच्या कलश रोहणाचा “सहावा वर्धापन दिन” सोहळा बुधवार दिनांक २७ एप्रिल रोजी संपन्न होणार आहे. त्यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ वाजता गणपती पुजन, देवतास नारळ, विडे अर्पण करुन समुहदायी गाऱ्हाणे, सकाळी ८:३० ते १:०० पर्यंत श्री देव बांदेश्वर मंदिरात लघुरुद्र…

Read More

वाहतूक पोलिसांना “बेसिक लाईफ सपोर्ट’ प्रशिक्षण

रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलचा उपक्रम ओरोस ता.१२-:अपघातग्रस्त व्यक्ती, पाण्यात बुडालेली व्यक्ती, दरीत कोसळलेली व्यक्तींना रुग्णालयात नेईपर्यंत सीपीआरचा सपोर्ट महत्वाचा असतो. त्यामुळे अनेक रुग्णाचे प्राण वाचू शकतात, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षक प्रवीण सुलोकर यांनी दिली. कसाल येथील ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ कार्यक्रमात ते बोलत होते. रस्त्यावर घडणाऱ्या अपघातांचा सामना नेहमीच वाहतूक पोलीसांना करावा लागतो….

Read More
You cannot copy content of this page