सौ. चित्रा हरमलकर ठरल्या पैठणीच्या मानकरी

मालवण ता.१२-:* रामनवमी उत्सवानिमित्त मालवण गवंडीवाडा येथील श्रीराम मंदिर यांच्या वतीने आयोजित आणि आनंद वराडकर पुरस्कृत खेळ पैठणीचा या स्पर्धेत सौ. चित्रा चेतन हरमलकर या विजयी होऊन होत मानाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या.

तर सौ. अक्षता रोहन आचरेकर यांनी द्वितीय व सौ. रुपाली वराडकर यांनी तृतीय क्रमांक मिळविला. या स्पर्धेचे उदघाटन रवी तळाशीलकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी आनंद वराडकर, श्रीपाद गवंडी, विलास गवंडी, श्री. मसुरकर, बाळा मयेकर, दिगंबर पाटील, सुरज मंडलिक, विकास पांचाळ, दिनेश वराडकर, प्रसाद गवंडी, सागर पाटकर, सचिन पाटकर, हेमंत शिरगावकर, हेमंत वराडकर, संतोष मंडलिक, राहुल परुळेकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. या स्पर्धेत ३२ महिला स्पर्धक सहभागी झाल्या होत्या. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना संध्या परुळेकर, मधुमती शिरगावकर, अर्चना तिरोडकर यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत परीक्षक म्हणून जितू तिरोडकर, रोहित परुळेकर, आराध्या गवंडी यांनी काम पाहिले. सुत्रसंचालन विनोद सातार्डेकर यांनी केले.

You cannot copy content of this page