मालवण ता.१२-:* सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी), समतादूत प्रकल्प सिंधुदुर्ग आणि बॅ नाथ पै सेवांगण संचालित साने गुरुजी वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक समता सप्ताहानिमित्त साने गुरुजी वाचन मंदिर मालवण येथे सलग १८ तास वाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात विनिता पांजरी यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धेचे उद्घाटन ऍड. सुदीप कांबळे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. सलग वाचन उपक्रमामध्ये एकूण १८ स्पर्धक सहभागी झाले होते. विनिता पांजरी यांनी सलग दहा तास वाचन केले.
गायत्री गावकर यांनी नऊ तास आणि संचिता कांदळकर यांनी अनुक्रमे सात तास वाचन केले. सकाळी ८.३० ते सायंकाळी ६.३० अशी सलग वाचन स्पर्धेची वेळ निश्चित करण्यात आली होती. वाचकांना बार्टीतर्फे भेटवस्तू आणि प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. साने गुरुजी वाचन मंदिरच्यावतीने विजेत्यांना युवा साधनाचा अंक भेट देण्यात आला. वाचकांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना या कार्यक्रमाद्वारे मानवंदना देण्यात आली. या कार्यक्रमाला प्रकल्प अधिकारी विजय कदम, समतादूत ऍड. सुदीप कांबळे, सगुण जाधव, सुजित, जाधव, राजू दिनदयाळ, श्यामल सावंत, सौ. मेघना जोशी, संग्राम कासले आणि साने गुरुजी वाचन मंदिरचे कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक सुदीप कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन संग्राम कासले यांनी केले. संजयकुमार रोगे यांनी आभार मानले. समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त दिपक घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली समता सप्ताहाच्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.
