विलवडे नं.१ प्रशालेत “शाळा पूर्व तयारी” सोहळा उत्साहात

बांदा ता.१२-: जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक शाळा विलवडे नं.१ प्रशालेत “शाळा पूर्व तयारी” सोहळा उत्साहात संपन्न झाला. यामध्ये पुढील शैक्षणिक वर्षातील नवीन पहिलीत येणाऱ्या मुलांचे स्वागत, मुलांची बौद्धिक, शारीरिक आणि इतर क्षमता तपासणी करण्यात आली. तसेच कोरोना काळात झालेल मुलांचं शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी विचार विनिमय तसेच मुलाकडून घरी अभ्यास कसा करुन घ्यावा याविषयी पाल्यांना मार्गदर्शन केले.

या सोहळ्याचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन सदस्य व विलवडे गावचे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ राजाराम दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यापुर्वी राजाराम दळवी यांनी मुलांना शेक्षणिक विकास व शाळेच्य‍ा सुशोभिकरण्यासाठी आर्थिक सहकार्य केली आहे. तसेच त्यांनी शाळेसाठी यापुढे हि सहकार्य करण्यासाठी त्यांनी आश्वासन दिले.
शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सोनू दळवी, मुख्याध्यापक सुप्रिया सावंत, शिक्षक मनोहर गवस, दिपाली गाडे, सुस्मिता मांगले उपस्थित होते. श्री दळवी आणि इतर शिक्षक यांनी मुलांना मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन मनोहर गवस व आभार सुस्मिता मांगले यांनी केले.

You cannot copy content of this page