महाराष्ट्र हद्दीत काम सुरू असताना कर्नाटक वन विभागाची दंडेलशाही;.

कर्नाटक वन विभागाची दंडेलशाही खपवून घेणार नाही; बाबुराव धुरी

दोडामार्ग ता.१२-:* सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या वतीने मांगेली तळेवाडी ते कर्नाटक सडा हद्दीपर्यंत रखडलेले काम सुरु झाले असताना मंगळवारी या ठिकाणी आलेल्या कर्नाटक कणकुबी वन विभागाचे वन कर्मचारी यांनी महाराष्ट्र हद्दीत काम सुरू असताना या ठिकाणी वन विभागाचा काडीमाञ संबध नसताना मुजोर वन कर्मचारी यांनी येथे काम करत असलेल्या ठेकेदाराच्या एका कामगाराला गाडीत घालून घेऊन जाण्याचा धक्कादायक प्रकार घडला त्यामुळे कर्नाटक वन विभाग यांच्या मुजोरी बाबत संताप व्यक्त केला जात आहे.

या घटनेचे वृत्त समजताच या कामगाराला वन विभाग यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाबुराव धुरी इतर पदाधिकारी कणकुबी वन विभाग येथे रवाना झाले आहेत वन विभाग कर्नाटक यांची ही दंडेलशाही खपवून घेणार नाही असा इशारा बाबुराव धुरी यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page