कोकणातील पहिल्या सर्फिंग स्कूलचा शुभारंभ…

स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षक जान्हवी देवधर यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ

देवगड ता१२-: कोकणातील पहिले सर्फिंग स्कुल असून याचा शुभारंभ भारतातील सर्वात तरुण महिला विशेष स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षक जान्हवी अभिजित देवधर यांच्या हस्ते देवगड जामसंडे नगरपंचायत नगराध्यक्षा साक्षी प्रभू नगरसेवक निवृत्ती (बुवा तारी)यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले .

देवगड मध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी नवीन उपक्रम करण्याचा प्रयत्न फ्लाईंग कोकण तर्फे कोकणातील पहिले बोर्ड सर्फिंग स्कुल श्रीकांत जोईल व वैष्णवी जोईल या भावंडांनी सुरू करण्यात यश आले.आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या धाडसी खेळाची ओळख आपल्या कोकण किनारपट्टीवर येणाऱ्या पर्यटकांना तसेच स्थानिकांना व्हावी जेणेकरून जास्तीत जास्त तरुण वर्ग या क्षेत्रात येऊन त्यातील व्यवसाय संधीचा लाभ घेतील .या प्रशिक्षण वर्गास इंटरनॅशनल सर्फिंग असोसिएशन चे प्रमाणपत्र लाभले आहे. यावेळी पर्यटन व्यावसायिक महासंघ जिल्हा उपाध्यक्ष रमाकांत आचरेकर,संचालक श्रीकांत जोईल वैष्णवी जोईल,रोटे.उपाध्यक्ष श्रीपाद पारकर,पर्यटन महासंघ पदाधिकारी अन्य ग्रामस्थ उपस्थित होते .

या वेळी वैष्णवी जोईल यांनी झिप लाईन च्या माध्यमातून येथील पर्यटनाला चालना देत असताना स्थानिक युवक युवतींना रोजगार दिला आहे.आणि देवगड सर्फिंग स्कुल च्या माध्यमातूनही येथील तरुण प्रशिक्षक निर्माण करून या उपक्रमातूनही स्थानिक युवकांना रोजगार निर्मिती हा उद्देश तसेच आगामी काळात वॉटर स्पोर्ट्स च्या माध्यमातून रोजगाराची संधी निर्माण होऊन या भागात पर्यटक स्थिरावेल.असे आवर्जून सांगितले. उदघाटक जान्हवी देवधर,विशेष कार्यकारी अधिकारी दयानंद मांगले ,नगरसेवक निवृत्ती तारी, नगराध्यक्षा साक्षी प्रभू, उपनगराध्यक्ष मिताली सावंत यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.सुत्रसंचालन आभार संजय धुरी यांनी मानले.

You cannot copy content of this page