देवगड तालुक्यातील लाईनमन भरती ताबडतोब करा

अन्यथा आंदोलन; भाजपचा महावितरणला इशारा

देवगड ता.१२-:* गेले काही दिवस देवगड जामसंडे शहरात वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे, शहरातील नागरिकांना व्यापारी व उद्योजक व्यावसायिक यांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याने संबंधित समस्येबाबत देवगड जामसंडे शहर भाजप कमिटीच्या वतीने देवगड महावितरण उप अभियंता यांना निवेदन देऊन वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा या मागणीचे पत्र देण्यात आले आहे.

उन्हाळा सुरू असल्याने वारंवार लाईट गेल्याने सर्वांना त्रास सहन करावा लागत आहे, पावसाळा जवळ येत असल्याने विद्युत वाहिन्यांच्या बाजूला असलेली झाडे ताबडतोब तोडण्यात यावी त्यामुळे वीज गळतीचे प्रमाण कमी होईल,देवगड तालुक्यामधील लाईनमन कमी असून ते लाईनमन ताबडतोब भरती करण्यात यावी सर्व बाबी तातडीने पूर्ण करण्यात यावी अन्यथा भारतीय जनता पार्टी देवगड मार्फत आंदोलन करण्यात येईल असे या निवेदनात म्हटले आहे,

नुकतेच देवगड भाजप शहर कमिटीच्या वतीने निवेदन महावितरण ला देण्यात आले आहे, यादरम्यान भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळा खडपे तालुका सरचिटणीस शरद ठुकरुल, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष दयानंद पाटील, नगरसेविका अँ. प्रणाली माने, माजी उपनगराध्यक्ष संजय तारकर, नगरसेविका तन्वी चांदोस्कर, नगरसेविका आद्या गुमास्ते, नगरसेविका स्वरा कावले, नगरसेविका रुचाली पाटकर, माजी नगरसेवक बापू जुवाटकर, भाजप कार्यकर्ते मिलिंद माने ,वैभव करंगुटकर, राजू कावले नगरसेवक रवींद्र चिंदरकर आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते,

You cannot copy content of this page