ओसरगाव येथील कार-मोटरसायकल अपघातप्रकरणी कारचालकाविरोधात गुन्हा

कणकवली ता.१२-:* मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव येथील असरोडी फाट्यानजीक इको कारने पल्सर मोटारसायकलला मागून जोरदार धडक दिल्याने काल भीषण अपघात झाला होता. या अपघातात प्रसन्ना उर्फ बाळा प्रकाश मुलुष्ठे(वय -४१ रा-कणकवली,मारुतीआळी) हा युवक जागीच ठार झाला,याप्रकरणी संशयित आरोपी विजय रामादास मोकल ( वय-३३,रा.कोयनाड, जि. रायगड) याला पोलिसांनी अटक केली.याप्रकरणी अभि अशोक आचरेकर यांनी फिर्याद दिली, त्यानुसार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, रायगड येथून कार चालक संशयित आरोपी व त्याचे चार मित्र मालवण येथे पर्यटनासाठी आले होते. काल सायंकाळी परत जात असताना ओसरगाव येथे हा अपघात घडला होता. इको कार भरधाव वेगाने होती, त्यामुळे दुचाकीला जोरदार धडक मागवून दिली. त्यामुळेच बाळा मुलुष्टे हे मोटरसायकल वरुन समोरील बाजूने रस्त्यावर जोरदार उडाले. त्यांच्या छातीच्या बरगड्या तुटलेल्या अवस्थेत होत्या, त्यांच्या डाव्या हातालाही खांद्यावर दुखापत झाली.तसेच मेंदूलाही गंभीर मार लागला. त्यामुळे त्यांचा नाकातून रक्तश्राव होऊन जागीच मृत्यू झाला,वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहिती नुसार पोलीस उपनिरीक्षक अनिल हादळ यांनी माहिती दिली.

You cannot copy content of this page