रफिक शेख; उपजिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या सुविधांबाबत प्रश्न सोडवण्यास केसरकरांना वेळ नाही
सावंतवाडी ता.१३-:* नगरपालिकेचे इलेक्शन केव्हाही लागू शकते अशी बातमी येताच आमदार दिपक केसरकर यांनी शहरात विकास कामांचा व निधीच्या घोषणांच्या पाऊस केला. आता पुन्हा इलेक्शन लांबणीवर गेल्याने आमदार दीपक केसरकर गायब झाले जसे पावसाळ्यात बेडकं अचानक येतात तसे दीपक केसरकर इलेक्शन आले की अचानक मतदारसंघात फिरू लागतात अशी टीका अल्पसंख्या भाजप जिल्हा उपाध्यक्ष रफिक शेख यांनी केली आहे. याबाबतची त्यांनी प्रतिक्रिया आपली ग्लोबल महाराष्ट्र कडे दिली आहे.
याबाबत ते पुढे बोलताना म्हणाले की कोरोना दोन वर्षाच्या काळात देखील आम. केसरकर हे कुठेही मतदारसंघात फिरताना दिसले नाहीत. तसेच महाराष्ट्रात खोटं बोलून लोकांच्या डोळ्यात धूळफेक करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करण्याची स्पर्धा लावली तर दीपक केसरकर यांचा पहिला नंबर लागेल. अशी टीका त्यांनी या वेळी केली.
तसेच ते म्हणाले की सावंतवाडी कुठे रुग्णालय मध्ये घाणीचे साम्राज्य तसेच पाण्याची कमतरता असताना मात्र आमदार केसरकर यांना ते प्रश्न सोडवण्यास वेळ नाही मात्र मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी त्यांच्याकडे लोकांना दिशाभूल करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ असल्याचे देखील त्यांनी टीका केली आहे. त्यामुळे केसरकर यांनी कितीही शहरात विकास कामांच्या घोषणा व नितीन चा पाऊस केला तरी येणार्या नगरपालिका इलेक्शन मध्ये भाजपची सत्ता येणार असंही त्याने विश्वास यावेळी व्यक्त केले.
