नगराध्यक्षा साक्षी प्रभू आणि उपनगराध्यक्ष मिताली सावंत यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ
देवगड ता.१२-: श्री भगवती फिल्म्स प्रेझेन्ट्स श्वास हा भिडला या मराठी गाणी अल्बम चा शुभारंभ देवगड बीच च्या निसर्गरम्य वातावरणात नगराध्यक्षा साक्षी प्रभू ,उपनगराध्यक्ष मिताली सावंत यांच्या शुभहस्ते गणेशपूजन पोस्टर फित कापून करण्यात आले.
यावेळी धनशी कामतेकर यांनी देवगड तालुका पर्यटकांना आकर्षित करणारा तालुका असून माझ्या गावाची पर्यटन ओळख दूरवर पोहचावी याच उद्देशाने देवगड बीच याठिकाणी एका गाण्याचे चित्रिकरण करण्यात येत आहे.असे आवर्जून सांगितले. नगराध्यक्षा साक्षी प्रभू,उपनगराध्यक्ष मिताली सावंत यांनी या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी देवगड तालुक्याच्या सुकन्या दिगदर्शक धनश्री कामतेकर,क्रिएटिव्ह हेड चंद्रकांत निकम,कलाकार आरती जोशी,मोहन कुळकर्णी,कोरिओग्राफर दुशनत इनामदार गायक हर्ष वर्धन प्रिया बनसोडे ,बिपीन दाईगुडे,वंदना सावंत राकेश सुतार,निकिता जोशी,विनोद देवगडकर,अन्य उपस्थित होते. देवगड बीच याठिकाणी या मराठी गाण्याच्या अल्बम मधील एका गाण्याचे चित्रीकरण होणार आहे. कोरिओग्राफर दुशनत इनामदार यांनी प्रास्तविक व मान्यवरांचे स्वागत केले.
