Headlines

सुप्रसिध्द चित्रकार प्रकाश कब्रे यांनी अक्षरघराला भेट देऊन केले कौतुक

⚡कणकवली ता.०६-: निकेतचे हे वैभव पाहण्याची कितीतरी दिवसांची इच्छा आज पूर्ण झाली. काही गोष्टी सगळ्यांनाच मिळत नाहीत. पण तुला मिळालेली प्रेमाची शिदोरी अशीच वाढू देत, असे उदगार सुप्रसिध्द चित्रकार प्रकाश कब्रे यांनी तळेरे येथे काढले. तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अक्षरघराला सुप्रसिध्द चित्रकार प्रकाश कब्रे यांनी भेट देऊन 15 वर्षांच्या वाटचालीबाबत कौतुक…

Read More

१२ सप्टेंबरची आमसभा रद्द

⚡सावंतवाडी ता.०६-: सावंतवाडी पंचायत समितीच्या आमसभेचे आयोजन सोमवारी १२ सप्टेंबरला वैश्य भवन येथे आयोजन करण्यात आली होती. ही सभा शिक्षण मंत्री तथा स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार होती. परंतु, मंत्री दीपक केसरकर यांच्या मंत्रालयीन कामकाजामुळे ही आमसभा रद्द करण्यात आली असून , आमसभेची पुढील तारीख लवकरच कळवण्यात येईल अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे पंचायत समिती…

Read More

15 सप्टेंबरच्या निषेध मोर्चाच्या नियोजनासाठी उदया माध्यमिक शिक्षक पतसंस्था येथे बैठक

⚡कणकवली ता.०६-:गुजरात मधील बिल्कीस बानोवर झालेल्या अन्याय अत्याचार प्रकरणी आरोपींना सोडून देण्यात आले याचा निषेध करण्यासाठी तसेच राजस्थान मधील जालौर जिल्ह्यातील दलित चर्मकार समाजातील इंद्र मेघवाल या नऊ वर्षीय विद्यार्थ्याला तहान लागली असता , शाळेतील माठातील पाणी पिले म्हणून मनुवादी वृत्ती असलेल्या शिक्षकाने जबर मारहाण केली, त्याचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला. या घटनांच्या निषेधार्थवंचित बहुजन…

Read More

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाला ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय २०२०-२१ पुरस्कार

वैभववाडी प्रतिनिधीवैभववाडी तालुक्यासारख्या ग्रामीण व डोंगरी भागातील गोरगरीब विद्यार्थी आणि विद्यार्थिनीना उच्च शिक्षणाची सोय करणाऱ्या आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाचा “ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय २०२०-२१” हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचालित आंनदीबाई रावराणे महाविद्यालय, वैभववाडीयेथील ग्रामीण भागातील तरुण आणि तरुणी हे सुसंस्कृत, सभ्य आणि सक्षम नागरिक होण्यासाठी उच्च शिक्षण देण्याचे महान कार्य…

Read More

चंदगड येथून मोबाईल घेऊन पळालेला अल्पवयीन मुलगा सावंतवाडी पोलिसांच्या ताब्यात

होमगार्डच्या जागृकतेमुळे उघडकीस आला प्रकार ⚡सावंतवाडी ता.०६-: होमगार्डच्या जागृकतेमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथून मोबाईल घेऊन पळालेल्या अल्पवयीन मुलाला सावंतवाडी येथे ताब्यात घेण्यात आले. सावंतवाडी बस स्थानकात रात्रीच्यावेळी सेवा बजावणाऱ्या होमगार्ड बस्त्याव पिन्टो यांच्यामुळे हा प्रकार निदर्शनास झाला. बस्त्याव यांनी याबाबतची माहिती सावंतवाडी पोलिसात दिल्यानंतर त्याची चौकशी करुन सावंतवाडी पोलिसांनी त्याला चंदगड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे….

Read More

मनोज मेस्त्री यांचे 10 रोजी रत्नागिरी येथे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन

⚡कणकवली ता.६-:खल्वायन रत्नागिरी आयोजित २८१ वी अन्नपूर्णाबाई (गोदूताई)अनंत जोगळेकर स्मृति संगीत सभा शनिवार १० सप्टेंबर २०२२ सायंकाळी ७ ते ९ वा. स्थळः सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय, एस्.टी. स्टँड समोर, रत्नागिरी येथे होणार असून यावेळीपं.डॉ.समीर दुबळे यांचे शिष्य कणकवली येथील गायक मनोज भालचंद्र मेस्त्री यांचे शांस्त्रीय व उपशास्त्रीय गायन होणार आहे.यावेळी तबला साथ:रामकृष्ण करंबेळकर व संवादिनी…

Read More

वेंगुर्ला पोलिस स्टेशनच्या आठ कर्मचा-यांना बढती

⚡वेंगुर्ला ता.०६-: जिल्हा पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे व अप्पर पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांनी पोलिस कर्मचा-यांना पदोन्नती दिली आहे. वेंगुर्ला पोलिस ठाण्यातील रमाकांत दळवी यांनी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकपदी तर योगेश वेंगुर्लेकर, नितीन चोडणकर, वंदना धारपवार, दीपा धुरी, विठ्ठल धुरी, योगेश सराफदार, तुकाराम परब यांना पोलिस नाईक या पदावरुन पोलिस हवालदारपदी पदोन्नती मिळाली आहे.

Read More

न्हावेली महिला सरपंचांनी पाच वर्षात आणला 72 लाखांचा निधी

विविध माध्यमातून ग्रामपंचायतला मिळाले सात लाखांचे पुरस्कार ⚡सावंतवाडी ता.०६-: विकासाच्या प्रक्रियेत गाव शहराच्या बरोबरीने विकसित व्हावे या उद्देशातून ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहाराचे संपूर्ण अधिकार सरपंचांना दिले आहेत. ग्रामपंचायतीचा गोळा होणारा स्वनिधी कितीही असो, पण सरपंचाने ठरविले तर गावाच्या विकासासाठी तो कुठुनही निधी खेचून आणू शकतो याचे जिवंत उदाहरण म्हणजे न्हावेली सरपंच प्रतिभा प्रकाश गावडे यांनी गावात…

Read More

शिक्षक दिनी आसोली येथील जेष्ठ सेवानिवृत्त शिक्षक लवू देसाई यांचा सत्कार

राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य एम.के.गावडे यांनी दरवर्षी प्रमाणे केला सत्कार ⚡वेंगुर्ले ता.०६-: अणसूर-पाल येथील हायस्कुलमध्ये सुमारे 39 वर्षे शिक्षक म्हणून सेवा देवून निवृत्त झालेले आज वय वर्षे 88 व्या असतानाहि विद्यार्थ्यांना व मुलांना मार्गदर्शन करत करत असलेले व वाचन हाच शिक्षणातील विकासाचा प्रमुख घटक म्हणून संबोधित करणारे आसोली गावचे रहिवासी लवू देसाई यांचा शिक्षक दिनाचे औचित्य…

Read More

मठ येथील पंधरा वर्षीय मुलाच्या हातात फुटला ॲटमबॉम्ब

पाच दिवसाच्या गणपती विसर्जनावेळी अपघात ⚡वेंगुर्ले ता.०५-: मठ येथील वैभव आईर या पंधरा वर्षीय मुलाच्या हातामध्ये रात्री पाच दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करताना ॲटमबॉम्ब फुटून अपघात झाला. यामध्ये त्याच्या हाताला मोठी दुखापत झाली आहे. ओरोस येथील उपजिल्हा रुग्णालयात त्याच्यावर अधिक उपचार करण्यात आले. वेंगुर्ली तालुक्यातील मठ येथील पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन सुरू असताना मोठ्या प्रमाणात फटाक्यांची…

Read More
You cannot copy content of this page