मनोज मेस्त्री यांचे 10 रोजी रत्नागिरी येथे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन

⚡कणकवली ता.६-:
खल्वायन रत्नागिरी आयोजित २८१ वी अन्नपूर्णाबाई (गोदूताई)अनंत जोगळेकर स्मृति संगीत सभा शनिवार १० सप्टेंबर २०२२ सायंकाळी ७ ते ९ वा. स्थळः सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय, एस्.टी. स्टँड समोर, रत्नागिरी येथे होणार असून यावेळी
पं.डॉ.समीर दुबळे यांचे शिष्य कणकवली येथील गायक मनोज भालचंद्र मेस्त्री यांचे शांस्त्रीय व उपशास्त्रीय गायन होणार आहे.
यावेळी तबला साथ:रामकृष्ण करंबेळकर व संवादिनी साथ: वरद सोहनी यांची राहणार आहे.

गेले २३/२४ वर्ष रत्नागिरीतील खल्वायन संस्था मासिक संगीत सभा आयोजित करते आहे. संपूर्ण कोकणातील एकमेव अशा या उपक्रमातला मी २८१ वा कलाकार असून शास्त्रीय संगीतासाठी निष्ठेने काम करणाऱ्या मंचावर माझी कला सादर करायला मिळतेय याचा आनंद आहे. असे यावेळी मनोज मेस्त्री यांनी सांगितले.

You cannot copy content of this page