श्री साई इन्फोटेक कॉम्प्युटर सेंटरला एमएससीआयटी व क्लिक बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड
एमकेसीएलच्या संचालकिय व्यवस्थापिका वीणा कामत यांनी केला सन्मान ⚡सावंतवाडी ता.०८-: सिंधुदुर्ग येथे एमकेसीएलच्या विभागीय मेळाव्यात “श्री साई इन्फोटेक (एस.एस.आय)” कॉम्प्युटरला सिंधुदुर्गातील “एमएस-सीआयटी” व “क्लिक” बेस्ट परफॉर्मिंग सेंटर या पुरस्काराने गौरविण्यात आले. एमकेसीएलच्या संचालकीय व्यवस्थापिका वीणा कामत यांच्या हस्ते “एसएसआय कॉम्प्युटर”चे संचालक रघुनाथ तानावडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
