बेकायदा दारू वाहतुकी विरोधात बांदा पोलिसांची मोठी कारवाई

३८ लाख ४३ हजार चा मुद्देमाल जप्त; एक जण ताब्यात

बांदा/प्रतिनिधी
बेकायदा दारु वाहतुकी विरोधात बांदा पोलीसांनी मोठी कारवाई केली आहे . बांदा पंजाबी ढाब्यासमोर ट्रकची तपासणी केली ( एमएच ४८ बीएम ८०६७ ) असता त्यात मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीचा दारुसाठा आढळून आला . या कारवाईत २१ लाख ४३ हजार ८०० रुपयांची दारु व १७ लाख रुपयांचा ट्रक असा एकूण ३८ लाख ४३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी भूषण सुरेश राजम ( रा- मुंबई ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला . तो गोवा ते नाशिक अशी दारु वाहतूक करणार होता . सदर कारवाई बांदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे , राजेंद्र शेळके , प्रथमेश पोवार , कपिल हळदे यांनी केली

You cannot copy content of this page