मळगाव येथील दत्तमंदिरात दत्त जयंती उत्सव साजरा*

मळगाव येथील ह. भ. प. शेखर पाडगावकर यांचे दत्त जन्मावर सुश्राव्य किर्तन सादर

⚡सावंतवाडी ता.०७सहदेव राऊळ-: मळगाव रस्तावाडा येथील स्वयंभु औदुंबर दत्तमंदिरात आज मोठ्या उत्साहात दत्तजयंती उत्सव साजरा करण्यात आला. यनिमित्त मळगाव येथील ह. भ. प. शेखर पाडगावकर यांनी दत्त जन्मावर सुश्राव्य किर्तन सादर केले. मळगाव येथील भाविकांनी केळी, नारळ ठेवून दत्ताचे दर्शन घेत कीर्तनाचा लाभ घेतला.


दत्तजयंती निमित्त सायंकाळी दत्त प्रासादिक भजन मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर ह. भ. प. शेखर पाडगावकर यांचे सुश्राव्य किर्तन झाले. कीर्तनाला सुनील पाडगावकर, गजानन मेस्त्री, प्रसन्न जोशी आदींनी साथसंगत केली. त्यानंतर भाविकांच्या उपस्थितीतीत दत्तजन्म सोहळा पार पडला. त्यानंतर आरती व उपस्थित भाविकांना तीर्थप्रसाद वाटप करण्यात आला. दत्त जयंती निमित्त मंदिराभोवती विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मळगावातील भाविकांनी उपस्थिती दर्शवत दत्त दर्शन व कीर्तनाचा भाविकांनी लाभ घेतला.

You cannot copy content of this page