⚡सावंतवाडी ता.०७-: आंबेगाव सुतारवाडी येथील पुंडलिका धाकू वरक वय ५० यांनी आपल्या घराच्या मागील काजूच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार आज दुपारी उघडकीस आला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केला असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सावंतवाडी रुग्णालयात शविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आला. या घटनेची तक्रार मयताचा पुतण्या कृष्णा वरक यांनी पोलीस ठाण्यात दिल्यानुसार याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
