सदस्य पदासाठी १५३ जणांची माघार;तीन ग्राम पंचायती बिनविरोध
सावंतवाडी : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली असून ५२ ग्रामपंचायत निवडणूका होवू घातल्या आहेत. यापैकी ३ ग्रामपंचायत या बिनविरोध झाल्यात. येत्या १८ डिसेंबर रोजी या ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज होती. यामध्ये सरपंच पदासाठी 185 पैकी 53 जणांनी आपले अर्ज मागे घेतले. तर 914 पैकी 153 सदस्यांनी अर्ज मागे घेतले. तर 1 अर्ज दुबार झाला. 52 ग्रामपंचायतसाठी
132 पैकी सरपंच पदासाठी 125 रिंगणात असून 760 पैकी 648 सदस्य रिंगणात आहेत. 112 सदस्यांची बिनविरोध निवड झाली असून 7 सरपंच बिनविरोध निवडून आलेत. यात आजगाव, गेळे, कुडतरकर टेंब सावरवाड, नेतर्डे, सातोसे, तांबुळी, वाफोली सरपंच बिनविरोध निवड झालीय. तर गेळे, कुडतरकर टेंब सावरवाड, नेतर्डे ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यात या निवडणुकीच मतदान १८ डिसेंबर सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत तर मतमोजणी २० डिसेंबर रोजी होणार आहे. आजपासून खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झाली आहे
