प.पू.भालचंद्र महाराज संस्थानच्या
शिष्यवृत्ती सराव परीक्षेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
कणकवली व सावंतवाडी केंद्रावर पार पडली परीक्षा ⚡कणकवली ता.२२-:परमहंस भालचंद्र महाराज संस्थानाच्या शैक्षणिक मंडळातर्फे रविवारी कणकवलीव सावंतवाडी केंद्रावर जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षा घेण्यात आली. ८३१ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.कणकवली केंद्रावरील या स्पर्धेचे उद्घाटन पुणे येथील सद्गुरु माऊली महाराज व भालचंद्र महाराज संस्थानाचे अध्यक्ष सुरेश कामत यांच्या हस्ते झाले. यावेळीशिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे,…
