बॅरिस्टर नाथ पै वक्तृत्व स्पर्धेत
प्रतीक्षा पाटील प्रथम

रिया प्रभूदेसाई द्वितीय, सानिका काळसेकर तृतीय

⚡कणकवली ता.२२-: कणकवली नगरवाचनालय आयोजित व कै. आनंद आळवे पुरस्कृत बॅ.नाथ पै वक्तृत्व स्पर्धा येथील कणकवली नगरवाचनालयाच्या वतीने घेण्यात आली. यात प्रतीक्षा पाटील हिने प्रथम क्रमांक मिळवला. रिया प्रभूदेसाई हिने
द्वितीय तर सानिका काळसेकर हिने तृतीय क्रमांक मिळवला. उत्तेजनार्थ पारितोषिक
मैत्रीय आपटे व ईशा मुसळे हिने पटकाविले.
कणकवली नगरवाचनालयाच्या
वतीने सलग नवव्या वर्षी बॅ. नाथ पै यांचे जीवनचरित्र व कार्याच्या परिशिलन उमलत्या वयातील विद्यार्थ्यांना व्हावे. त्याची प्रेरणा विद्यार्थ्यांनी घ्यावी या उद्दात हेतुने कै. आनंद आळवे यांनी केलेल्या आर्थिक नियोजनातुन नाथ पै वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी नगरवाचनालयाचे कार्यवाह हनीफ पीरखान,कार्यवाह डी. पी. तानवडे, कार्यकारिणी सदस्य पी. जे. कांबळे, वैजयंती करंदीकर,
डॉ. विनायक करंदीकर आदी मान्यवर, नगर वाचनालयाचे कर्मचारी,पालक,विद्यार्थी उपस्थित होते. वक्तृत्व स्पर्धेचे आजचा विद्यार्थी आणि सहशालेय उपक्रम व बॅ. नाथ पै यांचे सुसंस्कृत जीवन आणि आजचा समाज हे विषय होते. या स्पर्धेचे परीक्षण डॉ. राज ताडेराव व मारुती चव्हाण यांनी केले. या स्पर्धेत १६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

You cannot copy content of this page